शिवसेना राज्यात पहिल्या क्रमांकावर आणू

शिवसेना राज्यात पहिल्या क्रमांकावर आणू

Published on

79589

शिवसेना राज्यात पहिल्या क्रमांकावर आणू
आमदार नीलेश राणेः मसुरेत विभाग प्रमुखासह कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश
सकाळ वृत्तसेवा
मसुरे, ता. २४ : मी आमदार झाल्यानंतर १२०० कोटीची विकासकामे होणार आहेत. यापूर्वी केवळ २०० कोटीची कामे मागील आमदारांच्या काळात झाली आहेत. कुडाळ-मालवणच्या वीज प्रश्नासाठी मोठा निधी मिळत असून एकूण १७ सबस्टेशन मंजूर झाली आहेत. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे काम कौतुकास्पद आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिप्रेत असा पक्ष राज्यात पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी झटूया, असे आवाहन प्रतिपादन आमदार नीलेश राणे यांनी येथे केले.
ठाकरे शिवसेनेचे मसुरे विभागप्रमुख राजेश गावकर, माजी ग्रामपंचायत सदस्य राघवेंद्र मुळीक, रिया आंगणे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मसुरे विभागाच्या वतीने आमदार राणे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, सचिव दादा साईल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, तालुकाप्रमुख नीलेश बाईत, राजा गावडे, युवा सेना जिल्हाध्यक्ष संग्राम साळसकर, युवती सेनेच्या श्रीमती पाटकर, विनायक बाईत, दीपक पाटकर, सरोज परब, गायत्री ठाकूर, लक्ष्मी पेडणेकर, नीलेश गावकर, छोटू ठाकूर, शिवाजी परब, जितेंद्र परब, पुरुषोत्तम शिंगरे, सचिन पाटकर आदी उपस्थित होते.
आमदार राणे म्हणाले, ‘‘गावाचे एकमत असल्यास मर्डे ग्रामपंचायतीचे मसुरे नाव पुन्हा कायम केले जाईल. रमाई नदीमधील गाळ काढण्याबाबत नियोजनात्मक काम करू. खाजणवाडी खार बंधाऱ्यासाठी प्रयत्न केले जातील. उपमुख्यमंत्री शिंदेंनी संधी दिल्यामुळे विधिमंडळात तुमचे प्रश्न मांडत आहे. इकडे जिल्हाध्यक्ष सामंत शिवसेना वाढवत आहेत. शिवसैनिक हे पद माझ्यासाठी फार मोठे आहे. विकासकामांसाठी सर्व निधी पूर्णपणे मिळेल. महायुतीचे शासन सर्व घटकांना न्याय देण्यासाठी आहे.’’
जिल्हाप्रमुख सामंत म्हणाले, ‘‘आमदार नीलेश राणे योग्य पद्धतीने काम करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश होत आहेत. तळाशील गाव समुद्रापासून वाचावे, यासाठी त्यांनी त्वरित योगदान दिले. या भागाच्या विकासासाठी उर्वरित कामे पूर्ण केली जातील. आमदार राणेंच्या पाठीशी अधिक उभे राहुया.’’
संजय आंग्रे, दादा साईल, संजय पडते, सरोज परब यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मसुरे विभाग प्रमुख गावकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com