गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप

गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप

Published on

79590

गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप
विद्यार्थ्यांचा गुणगौरव ः पाट प्रशाळेत पारितोषिक वितरण उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. २४ ः एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संचलित एस. एल. देसाई विद्यालय व सीताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालय तथा डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य, विज्ञान उच्च महाविद्यालय व (कै.) राधाबाई सामंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सुहासिनी रामचंद्र ठाकूर स्मृतिदिन व रामचंद्र नीळकंठ ठाकूर पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थी तसेच पाचवी व आठवी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी, पाचवी ते बारावीमधील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम संस्थाध्यक्ष दिगंबर सामंत यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी रोटरी क्लबचे सदस्य, सायकलिस्ट रुपेश तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. जे क्षेत्र, ध्येय आपण निवडतो, त्याची पूर्तता होते, तो आपल्या आयुष्यातील मोठा क्षण असतो. एकाग्रता वाढवा, ध्येय ठरवा, असा संदेश कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रुपेश तेली यांनी दिला. कष्ट, जिद्द, विश्वास यांच्या बळावर कोणतेही अशक्य काम तुम्ही शक्य करून दाखवू शकता. उच्चतम ध्येयासाठी प्रयत्न करा. संस्था तुमच्यासाठी कोणतीही गोष्ट करायला सदैव तत्पर आहे, असे आवाहन संस्थाध्यक्ष सामंत यांनी विद्यार्थ्यांना केले.
संस्था कार्याध्यक्ष देवदत्त साळगावकर यांनी रुपेश तेली यांचा सत्कार केला. सुहासिनी ठाकूर, रामचंद्र ठाकूर यांच्या स्मृतींना उजाळा देणारे भाषण प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका दीपिका सामंत यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक राजन हंजनकर, सूत्रसंचालन जान्हवी पडते, पारितोषिक वितरण प्रमुख यज्ञा साळगावकर यांनी केले. आभार प्रदर्शन शिक्षक प्रतिनिधी विजय मेस्त्री यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्था कार्यवाह विजय ठाकूर, संस्था सदस्य राजेश सामंत, महेश ठाकूर, पर्यवेक्षक सयाजी बोंदर तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com