संविधानातील समानतेच्या अधिकाराचे होणार उल्लंघन
संविधानातील अधिकाराचे होणार उल्लंघन
अॅड. अमेय परुळेकर ः समानतेचा मुद्दा, नोंदवली नवीन प्रभाग रचनेवर हरकत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रभाग रचनेवर रत्नागिरीतील वकील अमेय परुळेकर यांनी हरकत नोंदवली आहे. नव्या प्रभाग रचनेमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानातील अनुच्छेद १४ मधील समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा आक्षेप परुळेकर यांनी घेतला आहे. या संबंधी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
अॅड. परुळेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ५५ गटांची प्रभाग रचना करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या प्रभाग पुनर्रचनेत ६२ जिल्हा परिषद गट करण्यात आले; मात्र १४ जुलैला झालेल्या प्रभाग रचनेत जिल्हा परिषद गटांची संख्या ६ने कमी झाली आहे तर जिल्ह्यातील पंचायत समितीच्या गणांची संख्या २०१७ मध्ये ११० होती. यानंतर ती १२४ करण्यात आली; मात्र पुन्हा त्यात बदल करून गणांची संख्या १२ने कमी करण्यात आली आहे. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांसाठी वेगवेगळे आरक्षण पडत असते. १४ जुलैला परत रत्नागिरी जिल्हा परिषदेची प्रभाग रचना जाहीर केली म्हणजेच ही प्रभाग रचना कायम राहिली. अॅड. परुळेकर आता जे उमेदवार रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक लढवतील व प्रचार करतील त्यांना आधीची प्रभाग रचना सोडून नवीन प्रभाग रचनेनुसार प्रचार करावा लागेल व निवडणूक लढवावी लागेल. म्हणजे आधीचे उमेदवार व आता जे निवडणूक लढवणार त्या उमेदवारात भेदभाव होणार आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय संविधानातील समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन होणार असल्याचे परुळेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
वाढीव लोकसंख्या, आरक्षण तसेच न्यायालयाचा निर्णय यामुळे प्रभाग रचना जरी बदलावी लागत असेल तरी सर्व प्रवर्गचे उमेदवार जिल्हा परिषदेच्या प्रत्येक प्रभाग व गटात समान पद्धतीने निवडणूक लढवत नाहीत व जोपर्यंत त्यांना समान प्रभागात व गटात समान प्रचार करण्याची व समान निवडणूक लढवण्याची समान संधी मिळत नाही तोपर्यंत रत्नागिरी जिल्हा परिषदेची प्रभाग रचना अथवा गट किंवा आरक्षण बदलणे योग्य होणार नाही. कारण, तसा बदल केला गेला तर तो भारतीय संविधानातील समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन होईल. प्रत्येक प्रवर्गाच्या उमेदवाराला समान गट अथवा प्रभागात समान निवडणूक लढवण्याची व समान प्रचार करण्याची समान संधी मिळाल्यानंतरच रत्नागिरी जिल्हा परिषदेची कुठल्याही कारणासाठी प्रभाग रचना अथवा गट रचना बदलणे योग्य होईल, असे परुळेकर यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.