रानभाजी पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
79625
रानभाजी पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
धाकोरेत आयोजनः परिवर्तन महिला शेतकरी संघाचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २४ः धाकोरे येथील परिवर्तन महिला शेतकरी संघाच्यावतीने धाकोरा येथे आयोजित केलेल्या रानभाजी महोत्सव व रानभाजी पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महोत्सवाचे उद्घाटन सावंतवाडी मंडळ कृषी अधिकारी प्रकाश पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी रानभाजी व औषधी वनस्पती तज्ञ रामचंद्र शृंगारे, सावंतवाडी उपकृषी अधिकारी यशवंत गव्हाणे, परिवर्तन संघाच्या अध्यक्षा मनीषा गोवेकर, सचिव शुभदा गोवेकर, खजिनदार पूजा कोठावळे, उपाध्यक्षा जयवंती गोवेकर, सदस्य रूपाली मुळीक, संध्या मुळीक, प्रेरणा गवस, स्वप्नाली पालेकर, बबीता गोवेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पालव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित स्पर्धकांनी धाकोरा परिसरात मिळणाऱ्या परंतु लुप्त होत जाणाऱ्या अशा पावसाळी हंगामात मिळणाऱ्या रानभाज्या यात फागले, कुड्याच्या शेंगा, एक पानाची भाजी, अळू, फोडशी, चुरण पाला, कुर्डु, तायकाळा यांसारख्या नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या परंतु पोषण मूल्याने परिपूर्ण असलेल्या भाज्यांपासून वेगवेगळ्या पाककृती सादर केल्या. या पाककृतींचे परीक्षण हे रामचंद्र शृंगारे, प्रकाश पाटील, यशवंत गव्हाणे यांनी केले. या स्पर्धेत अनुक्रमे ममता साठेलकर, अक्षरा नाईक, पूजा कोठावळे यांनी प्रथम तीन क्रमांक मिळविले.
संध्या मुळीक व प्रेरणा गवस यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. वनस्पती तज्ञ शृंगारे यांनी महिलांना परिसरात आढळणाऱ्या वेगवेगळ्या वनस्पतींचे आपल्या आहारातील महत्त्व विशद केले. तसेच महिलांनीही धाकोरा पंचक्रोशी परिसरातील औषधी वनस्पतीची माहिती श्री. शृंगारे यांच्या कडून घेतली. यावेळी मंडळ कृषी अधिकारी प्रकाश पाटील यांनी कृषी विभागाच्या अनेक योजनांची माहिती देत महिलांनी त्याचा लाभ घ्यावा व स्वतःचा व संघाचा आर्थिक विकास साधावा असे आवाहन केले.
यावेळी यशवंत गव्हाणे यांनी धाकोरा परिसरामध्ये सर्वोत्तम दर्जाच्या आंबा, काजू, नारळ, रतांबे आहेत. त्यापासून महिलांनी सांघिक पद्धतीने वेगवेगळी युनिट बनवून प्रोडक्शन तयार करावे व मार्केटिंग करावे त्यासाठी कृषी विभाग सावंतवाडीकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी संघाच्या खजिनदार पूजा कोठावळे यांनी सर्व महिलांनी संघाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. गेल्या वर्षी आयोजित केलेल्या कलम बांधणी स्पर्धेत जास्तीत जास्त कलम बांधून ती वाढवल्याबद्दल रेखा माने यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
चौकट
महिलांचे सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील ः मनीषा गोवेकर
आपला धाकोरा गाव हा नैसर्गिक साधनसामुग्रीने युक्त आहे व तो नैसर्गिकपणात टिकून ठेवण्यासाठी संघ नेहमीच कटीबद्ध राहील. निसर्गाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक आर्थिक उत्पादन करणाऱ्या महिलांच्या मागे संघ नेहमीच उभा राहील. संघाच्या माध्यमातून धाकोरे व पंचक्रोशीतील महिलांसाठी कलम बांधणी प्रशिक्षण देणे किंवा रानभाजी संबंधित माहिती देणे, वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवून मॅंगो फुड प्रोडक्शनद्वारे त्याची विक्री करणे यासारखे उपक्रम गेल्या तीन वर्षात सुरु आहे. त्याचा फायदा संघातील महिला घेत आहेत. यापुढेही यासारखे अनेक उपक्रम संघाद्वारे राबवून महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी संघ प्रयत्नशील आहे, असे संघाच्या अध्यक्षा सौ. मनीषा गोवेकर यांनी यावेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.