शिक्षकांनी जपली सामाजिक बांधिलकी

शिक्षकांनी जपली सामाजिक बांधिलकी

Published on

N79629

शिक्षकांनी जपली सामाजिक बांधिलकी
विविध विधायक उपक्रमः शिक्षक समिती वर्धापन दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २४ः महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ले शाखेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले. शिक्षक समितीचे संस्थापक भा. वा. शिंपी, जॉन रॉड्रिग्ज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिवसातील विविध उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी कोकण विभाग सचिव संतोष परब, जिल्हा कोषाध्यक्ष कालिदास खानोलकर, तालुका कार्याध्यक्ष किरण मुडशी यांनी विचार प्रकट केले. यानंतर सभासद नोंदणी व संपर्क अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. तालुका शाखेमार्फत संतोष परब यांना प्रातिनिधिक स्वरुपात सभासद पावती देऊन या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. मठ कणकेवाडी शाळेत तालुक्यातील राज्य व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी शिक्षक समिती जुनी पेन्शन आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख शंकर वजराटकर, जिल्हा कोषाध्यक्ष कालिदास खानोलकर, जिल्हा कार्यालयीन चिटणीस कर्पूरगौर जाधव, तालुकाध्यक्ष प्रसाद जाधव, शिक्षक पतपेढी वेंगुर्ले शाखा संचालक सीताराम लांबर, विभागीय अध्यक्ष प्रकाश भोई यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे येथील नाग्या महादू कातकरी वसतिगृहास भेट देऊन आवश्यक औषधे व गोळ्यांचे वितरण तसेच खाऊ वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना आरोग्यदायी, दर्जेदार शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले. वसतिगृहाचे संचालक उदय आईर यांनी या उपक्रमाबद्दल आभार मानले.
तालुकाध्यक्ष जाधव, तालुका सचिव रामा पोळजी, शंकर वजराटकर, कालिदास खानोलकर, कर्पूरगौर जाधव, सीताराम लांबर, अंतर्गत हिशोब तपासनीस रामचंद्र मळगावकर, प्रकाश भोई, सीताराम नाईक, तालुका कार्याध्यक्ष किरण मुडशी, महिला आघाडी अध्यक्ष ऋतिका राऊळ, महिला आघाडी सचिव सरोज जानकर, महिला आघाडी शिक्षक नेत्या नेहा गावडे, मठ केंद्र संघटक राजश्री भांबर, सल्लागार एकनाथ जानकर, सिद्धेश्वर मुंडे, कणकेवाडी शाळेचे मुख्याध्यापक वीरधवल परब आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com