अवकाळी नुकसानीचे पंधरा लाख मंजूर
अवकाळी नुकसानीचे
पंधरा लाख मंजूर
कणकवलीः फेब्रुवारी ते मे या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. सिंधुदुर्गसाठी १५ लाख २३ हजार रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे. सिंधुदुर्गमधील शेतकरी, बागायतदारांच्या फेब्रुवारीमध्ये झालेल्या नुकसानीपोटी ३ लाख ६८ हजार, तर मार्चमध्ये झालेल्या नुकसानीपोटी ११ लाख ५५ हजार एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
...................
शिरोडा दशक्रोशीला
पावसाने झोडपले
शिरोडाः शिरोडा दशक्रोशीला बुधवारी (ता. २३) सकाळी पावसाने झोडपून काढले. मध्यरात्रीपासून पावसाने सुरुवात केली. दिवस उजाडल्यानंतर ढगफुटी सदृश पाऊस झाला. बऱ्याच ठिकाणी पाणीच पाणी होऊन रस्त्यांना नाल्याचे स्वरुप झाले होते. बायपास रस्त्यावरील काही दुकानांत पावसाचे पाणी घुसले. समुद्र जोरदार खवळला असून येत्या दोन-चार दिवसांत पावसाचा जोर वाढलेला राहील, असा मच्छीमार बांधवांचा अंदाज आहे. पावसामुळे शिरोडा बाजारपेठेतील रस्ते नालेरुप झाले होते. गटारांची साफसफाई वेळीच आणि योग्य प्रमाणात झाली नाही. पाण्याचा निचरा होणारे जुने मार्ग बदलले, त्यामुळे पाणी तुंबते, रस्त्यावरून पाणी वाहते, अशी प्रतिक्रिया व्यापारी, जनतेमधून व्यक्त केली जात आहे. शिसामुणगा रस्त्यावरील मागासवर्गीय वस्तीनजीकच्या रस्त्यावर पाणी साचल्याने हा मार्ग काही काळ बंद होता; मात्र वीजपुरवठा सुरळीत होता.
....................
माजगाव परिसरात
बिबट्याची दहशत
सावंतवाडीः माजगाव-सावंतवाडी येथील (कै.) भाईसाहेब सावंत समाधीस्थळ व दत्तमंदिर परिसरात बिबट्याच्या मुक्त वावराने तेथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी (ता. २२) रात्री ८.३० च्या सुमारास भाईसाहेब सावंत समाधीस्थळ परिसरात अमित शेटकर यांच्या घराबाहेर कुत्र्याला भक्ष्य करण्यासाठी आलेला बिबट्या नजरेस पडला. कुत्र्याच्या आवाजाने शेटकर यांनी खोलीतून पाहिले असता बिबट्या दिसला. काहीवेळ तिथेच थांबून नंतर त्याने जंगलात धूम ठोकली. वनविभागाने उपाययोजना करून गवारेड्यांबरोबरच बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
......................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.