खेर्डी इंग्लिश स्कूलमध्ये कायदेविषयक धडे

खेर्डी इंग्लिश स्कूलमध्ये कायदेविषयक धडे

Published on

- ratchl२४५.jpg-
२५N७९६७३
चिपळूण ः विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महिला पोलिस अधिकारी.
---------
खेर्डी स्कूलमध्ये कायदेविषयक धडे
‘सक्षम तू’ अभियान ; अमली पदार्थाबाबत मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ ः सक्षम तू या जनजागृती अभियानांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश सरचिटणीस दिशा दाभोळकर यांच्या पुढाकाराने खेर्डी-चिंचघरी येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांना कायदेविषयक धडे देण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हे अभियान राबवण्यात येत आहे. कार्यक्रमात महिला पोलिस उपनिरीक्षक मीरा महामुनी व पोलिस हवालदार समिधा पांचाळ यांनी विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा, सायबर गुन्हे, सोशल मीडियाचा योग्य वापर, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, टोल फ्री हेल्पलाईन नंबर तसेच आत्मसंरक्षणाचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले.
शालेय व महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध समस्या, अडचणी यावर योग्य तो प्रकाश टाकून त्या अडचणींवर मात करण्यासाठी कायदेशीर उपाययोजना, पोलिसयंत्रणेचा उपयोग याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही या सत्रात आपल्या समस्या मांडत सुस्पष्ट चर्चा केली. कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्षा आदिती देशपांडे, विधानसभा क्षेत्राध्यक्षा मनाली जाधव, ग्रामपंचायत सदस्य राकेश दाभोळकर, रियाज खेरटकर, प्रणाली दाभोळकर, रशिदा चौगुले, तालुका कार्यकारिणी सदस्य कोमल भोसले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक वरेकर, उपमुख्याध्यापिका जगताप आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी योगदान दिले. कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेला भारतीय संविधानाची आकर्षक फ्रेम भेट देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com