महिला व बाल रुग्णालयात डायलेसीस केंद्र
79681
महिला व बाल रुग्णालयात डायलेसीस केंद्र
आमदार राणेंच्या उपस्थितीत लोकार्पण; जिल्ह्यातील रुग्णांना लाभ घेण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २४ ः येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात किडनी डायलेसीस केंद्राचा लोकार्पण कार्यक्रम सोहळा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या ठिकाणी दहा किडनी डायलेसीस कार्यान्वित करण्यात आले आहेत
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, कुडाळ गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, संजय पडते, विनायक राणे, दीपक नारकर, दीपक पाटकर, राकेश कांदे, विलास कुडाळकर, रेवती राणे, आबा धडाम, आना भोगले, संदेश नाईक, राजन भगत, डॉ. भावना तेलंग, डॉ. संजय वाळके, ओंकार तेली, संजय भोगटे, मंगेश चव्हाण, रुपेश बिडये आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पाटील म्हणाले, ‘‘जिल्हा महिला व बाल रुग्णालय १०० खाटांचे असून डिसेंबर २०२० पासून रुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत झालेले आहे. यामध्ये महिलांचे स्त्री रोग विषयक आजार यावरील उपचार, शस्त्रक्रिया, प्रसुतीविषयक सेवा, बालरुग्णचिकित्सा उपचार, नवजात बालक उपचार चिकित्सा (एसएनसीयु) या सेवा २४ तास देण्यात येतात. शासनाने या रुग्णालयासाठी १०० खाटांच्या आकृतीबंधानुसार एकूण ४२ एवढी नियमित पदे नव्याने मंजुर केलेली आहेत. त्यापैकी २३ पदे भरलेली असून १९ पदे रिक्त आहेत. या पदांमध्ये वैद्यकिय अधिक्षक, स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ, बालरोग तज्ञ, एमबीबीएस वैदयकिय अधिकारी व इतर तांत्रिक आणि शुश्रुषा संवर्गातील पदे रुग्णालयीन सेवेसाठी भरलेली आहेत. कंत्राटी सेवेतील एकूण कुशल कर्मचारी वर्गाची ५२ पदे मंजूर असून बाह्यस्य यंत्रणेद्वारा ५१ पदे भरलेली आहेत. त्याव्यतिरिक्त बाह्यस्य यंत्रणेव्दारा ३ सफाईगार पदे भरलेली आहेत. रुग्णालयीन सेवेसाठी आवश्यक वैद्यकिय उपकरणे व आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध आहेत. रक्तपेढी सेवा सुरु करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरु आहे. शासनाकडून सार्वजनिक-खाजगी तत्वावरील कार्यक्रम (पीपीपी) याअंतर्गत किडनी डायलेसीस केंद्र मंजुर केलेले आहे. हे एका खासगी कंपनीकडून पीपीपी तत्वावर चालविले जाणार आहे, तसा संबंधित कंपनीबरोबर आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांच्याकडुन करार करण्यात आलेला आहे. पीपीपी तत्वावरील नवीन वरील डायलेसीसी केंद्राकरीता १० हिमोडायलेसीस यंत्र, आरओ प्लांट, डायलायझर रिप्रोसेसिंग मशिन व इतर आवश्यक साधनसामुग्री कार्यान्वीत केली आहे. किडनी डायलेसीस केंद्रात येणाऱ्या रुग्णांना हिमोडायलेसीस उपचार देण्यासाठी आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ, यामध्ये २ किडनी डायलेसीस तंत्रज्ञ, १ अधिपरिचारिका व १ सहाय्यक कर्मचारी असा कर्मचारी वर्ग कार्यरत झालेला आहे. डायलेसीस युनिट स्थापित्त केल्यानंतर रुग्णांची डायलेसीस उपचार चाचणी घेण्यात आली व ती यशस्वी झाल्याची खात्री झाल्यानंतरच युनिट लोकार्पणासाठी सज्ज झालेले आहे. या युनिटमध्ये प्रतीदिन २ सत्रामध्ये ३ ते ४ तास या कालावधीचे २० रुग्णांचे किडनी डायलेसीस उपचार नियमितरित्या सुरु होत आहेत. या सेवेमुळे कुडाळ तसेच नजीकच्या तालुक्यातील किडनीच्या आजाराने आजारी असलेल्या रुग्णांना मोफत उपचार मिळण्याची सुविधा आमदार राणे यांच्या प्रयत्नामुळे जनतेसाठी उपलब्ध झालेले आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.