भाजपातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
-rat२४p२९.jpg-
२५N७९७१८
रत्नागिरी : शहरातील प्रभाग ६ मध्ये भाजपच्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. त्या प्रसंगी विद्यार्थ्यांसमवेत भाजप पदाधिकारी.
-------
भाजपतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
रत्नागिरी, ता. २४ : शहर प्रभाग क्र. ६ मधील जोगळेकर हॉलमध्ये १००हून अधिक शालेय विद्यार्थ्यांना जय हो प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीच्यावतीने शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. भाजप आयटी सेलचे जिल्हाध्यक्ष नीलेश आखाडे यांनी याचे आयोजन केले. कार्यक्रमास १००हून अधिक विद्यार्थी व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. याकरिता जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहराध्यक्ष दादा ढेकणे, जय हो प्रतिष्ठानचे प्रमुख राजू भाटलेकर व महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश केळकर यांचे सहकार्य लाभले. राजेंद्र पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले. नीलेश आखाडे यांनी यापुढे दरवर्षी अशा प्रकारे शैक्षणिक साहित्य वाटप केले जाईल. तसेच विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण आल्यास कायम हाक द्या, मी नेहमी उपलब्ध असेन, अशी ग्वाही दिली. या प्रसंगी मनोज पाटणकर, कांचन मुळ्ये, सायली बेर्डे, पल्लवी पाटील, भक्ती दळी, नितीन जाधव, संगीता कवितके, नरेंद्र कदम, प्रज्ञा टाकळे, निधी आखाडे, शैलेश बेर्डे, अनुराग दांडेकर, रंजना भोसले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.