प्रतिकूल स्थितीत संघर्ष करत संजना झाल्या मत्स्य अधिकारी
-rat२४p२५.jpg-
२५N७९७१४
रत्नागिरी : संजना सारंग-चौगुले
-rat२४p२६.jpg-
२५N७९७१५
मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी संजना सारंग हिची आई श्रीमती सोनाली सारंग यांचा गोदूताई जांभेकर विद्यालयात सत्कार करताना राजन मलुष्टे. सोबत श्रेया सारंग, मुख्याध्यापिका संजना तारी.
-----
प्रतिकूलतेशी झुंझत संजना सारंग बनल्या मत्स्य अधिकारी
मासेमारी विक्री करून आई-आजीने शिकवले ; शिक्षकांनी केलेल्या मदतीचे फळ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : मासेमारी करून गुजराण करणाऱ्या व प्रसंगी दोनवेळचे अन्नही घरी शिजत नव्हते, अशी प्रचंड प्रतिकूल परिस्थिती. वडिलांचे निधन झाल्याने आधार हरपला; पण आई व आजीने जिद्द न हरता स्वतः मासे विकले. तिन्ही मुली शिकल्या पाहिजेत, या ऊर्मीने या दोघी महिलांनी रक्ताचे पाणी केले. पुरेसे शैक्षणिक साहित्य नसतानाही गोदूताई जांभेकर विद्यालय, तिथले शिक्षक आणि समाजातील दानशूरांच्या मदतीने मुलीने स्पर्धा परीक्षेचे शिक्षण घेतले आणि तिची मत्स्य अधिकारीपदी निवड झाली. ही प्रेरणादायी कथा आहे, संजना सारंग यांची.
संजना यांनी ठाणे जिल्ह्यातील वाडापोखरण येथे मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. कठोर परिश्रमाने मिळवलेल्या या यशाबद्दल संजना यांची आई सोनाली सारंग व बहीण श्रेया यांचा सत्कार जांभेकर विद्यालयात शाळा समिती अध्यक्ष राजन मलुष्टे व प्र. मुख्याध्यापिका संजना तारी यांच्या हस्ते करण्यात आला.
सारंग कुटुंबीय रत्नदुर्ग किल्ला परिसरातील रहिवासी. सारंग यांनी सांगितले, माझे बालवाडीपासूनचे १० वीपर्यंतचे शिक्षण सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात झाले. त्या वेळी घरची गरिबी असूनही शिक्षक, शिक्षिकांनी गणवेश, वह्या, दप्तर, शैक्षणिक साहित्याची मदत केली. आयुष्यात स्वप्न पाहण्याचे शिकवले. परिस्थितीला कमी लेखले नाही व प्रत्येकवेळी आत्मविश्वास दिला. २०१२ मध्ये मत्स्य अभियांत्रिकीच्या पदविकेसाठी प्रवेश घेतला. ही पदविका घेतल्यानंतर मत्स्यविज्ञानाच्या पदवीसाठी थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळाला. २०१८ मध्ये पदवी प्राप्त झाली. मत्स्यप्रक्रिया तंत्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण २०२० मध्ये पूर्ण केले. वडिलांचे २०१४ मध्ये निधन झाले; पण आज नोकरी लागल्याने त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेमध्ये सागरमित्र ही नोकरी स्वीकारली. वर्षभराने कांदळवन प्रकल्पामध्ये काम केले. त्यात खूप गोष्टी शिकायला मिळाल्या तसेच २०२१ पासून पोंक्षे यांचे मार्गदर्शन घेतले व मत्स्य व्यवसाय खात्याची स्पर्धा परीक्षेत यश मिळाले. २०२३ मध्ये वाहतूक व्यावसायिक हरिश चौगुले यांच्याशी विवाह झाला. त्यांचाही पाठिंबा मिळतोय.
---
कोट
घरची गरिबी होती; पण मुलींचे शिक्षण होण्यासाठी खूप कष्ट घेतले. मुलीसुद्धा मासेविक्री, मासे कापण्याच्या कामासाठी जात. कंपनीतीही काम केले. पै पै साठवून व आजीच्या पाठिंब्यामुळे तिन्ही मुलींचे शिक्षण पूर्ण केले. शाळेनेही आम्हाला खूपच मदत केली आहे. आज खूप अभिमान वाटतोय.
- श्रीमती सोनाली सारंग, आई.
--------
कोट
शैक्षणिक क्षेत्रात अनेक यशोगाथा घडतात. संजनाची यशकथा हृदयस्पर्शी व प्रेरणादायी आहे. गरिबी, आर्थिक अडचणी, घरची जबाबदारी या साऱ्यांचा सामना करत तिने वाटचाल केली आहे. हुशार व कष्ट करण्याच्या तयारीमुळे विद्यालयाने तिला वेळोवेळी मदतीचा हात दिला.
-संजना तारी, मुख्याध्यापिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.