तळाशील किनारपट्टी सुरक्षित करणार
swt२४३६.jpg
७९७७१
तळाशीलः येथे उधाणाचा फटका बसून समुद्राने गिळंकृत केलेल्या तळाशिल किनारपट्टीची आमदार निलेश राणे यांनी पाहणी केली. यावेळी उपस्थित जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व इतर.
तळाशील किनारपट्टी सुरक्षित करणार
आमदार निलेश राणेः नुकसानग्रस्त भागाची पहाणी, मेपर्यत बंधारा पूर्ण करण्याचे आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. २४ः तळाशील बंधाऱ्याचा प्रश्न केव्हाच मार्गी लागला असता केवळ राणे कुटुंबाला श्रेय मिळेल म्हणून तळाशील ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालण्याचे काम तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने केले. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. तळाशील किनारपट्टी भक्कम बंधाऱ्याने सुरक्षित करणार असल्याची ग्वाही आमदार निलेश राणे यांनी ग्रामस्थांना दिली. या बंधाऱ्यासाठी १३ कोटी मंजूर झाले असून मेपर्यंत बंधारा पूर्ण केला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
तळाशील किनारपट्टी भागाला मुसळधार पाऊस व समुद्राला असलेल्या उधाणाचा फटका बसून बंधारा नसलेल्या भागाचा अंदाजे पंधरा ते वीस फूट भूभाग समुद्राने काही दिवसांपूर्वी गिळंकृत केला होता. यावर तातडीने उपाययोजना म्हणून आमदार राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्वखर्चाने बंधारा घालण्याचे काम हाती घेतले होते. अधिवेशनानंतर आज आमदार राणे यांनी तळाशील भागाला भेट देत किनारपट्टीची पहाणी करत ग्रामस्थांशी संवाद साधला.
ते म्हणाले, ‘‘तळाशील बंधारा व्हावा म्हणून ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. मी आमदार नसतानाही ग्रामस्थांची भेट घेत १० कोटीचा निधी उपलब्ध करून देतो, असे सांगितले होते. त्याची कार्यवाही पण चालू केली. त्यावेळेस खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून १० कोटीचा निधी येत होता. परंतु, तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने अनेक कारणे देत तो निधी इथे येऊ दिला नाही. केवळ राणेंना श्रेय मिळेल म्हणून हा निधी नाकरण्याचे काम त्यांनी केले. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. आमचे सरकार आहे. कोणत्याही अडचणी आल्या तरी त्या दुर सारून विकास साधू. तळाशील किनारपट्टी भक्कम बंधाऱ्याने सुरक्षित केली जाणार असून ८०० व ५०० मीटरचा दुसरा टप्पा असणाऱ्या बंधऱ्यांसाठी १३ कोटी रुपये मंजूर आहेत. मेपर्यंत हा बंधारा पूर्ण केला जाणार आहे.’’
यावेळी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आमदार राणेंचे तसेच तात्काळ दखल घेणाऱ्या श्री. सामंत यांचे आभार मानले. तळाशीलचा भुभाग वाचला असेल तर तो राणेंमुळेच, असे ग्रामस्थांच्यावतीने माजी सरपंच जयहरी कोचरेकर यांनी सांगितले. गावावर प्रसंग ओढवला असताना श्री. सामंत गावात ठाण मांडून होते, असे सांगत त्यांचेही ग्रामस्थांच्या वतीने श्री. कोचरेकर यांनी आभार मानले.
यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजय पडते, युवती जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजा गावडे, मालवण शहरप्रमुख दीपक पाटकर, दादा साहिल, आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, तोंडवळी माजी सरपंच जयहरी कोचरेकर, चेतना फायबरचे संजय तारी, ग्रामपंचायत सदस्य भूपाळ मालंडकर, केशर जुवाटकर, संजय तारी, नंदकिशोर कोचरेकर, डॉ. प्रमोद कोळंबकर, जयप्रकाश परुळेकर, मुजफ्फर मुजावर, चंदू कदम, श्रीकृष्ण रेवंडकर, सुधाकर आडकर, गणेश रेवंडकर, विद्याधर पराडकर, गजा कांदळगांवकर, प्रकाश बापर्डेकर, पांडुरंग शेलटकर, कुणाल पाटकर, गौरव मालोंडकर, पांडुरंग तारी, श्रीकृष्ण टिकम, सत्यवान केळुसकर, आनंद खडपकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.