रुद्रयज्ञ, रक्षासूत्र बंधन कार्यक्रम उत्साहात
80078
हिंदू संस्कृतीचा जागर, एकोपा टिकविण्याचा संदेश
सावंतवाडीत ‘रूद्रयज्ञ, रक्षासूत्र बंधन’; विठ्ठल मंदिरात शेकडोंची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ ः येथील विठ्ठल मंदिरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे आयोजित रूद्रयज्ञ आणि रक्षासूत्र बंधन कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. या धार्मिक-सामाजिक उपक्रमातून हिंदू संस्कृतीचा जागर, राष्ट्रप्रेमाची भावना आणि समाजातील एकोपा टिकवण्याचा सकारात्मक संदेश दिला. युवावर्गाचा उत्स्फूर्त सहभाग लक्षवेधी ठरला.
श्री. आणि सौ. विनायक रांगणेकर तसेच श्री. आणि सौ. विक्रम देशपांडे यांच्या हस्ते यज्ञाला सुरुवात झाली. सकाळपासूनच विठ्ठल मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होती. वेदमूर्ती भूषण केळकर, गणेश दीक्षित, सुमित मावळंकर, रवींद्र योगी, राजू नातू, विनायक गानू, प्रसाद गोठोस्कर, सचिन जड्ये, सचिन माजगावकर, राजेश पित्रे, वेदांग पटवर्धन, संदीप मुंडले, रोहित दांडेकर, नीतेश साधले, सुधीर कशाळीकर, गजानन सातावळेकर, सुशांत भागवत, श्रीकांत वावडे, विष्णू जोशी, सागर माईणकर यांच्यासह अनेक वेदमूर्तींनी मंत्रोच्चार आणि आहुती देऊन धार्मिक वातावरण निर्माण केले. यज्ञानंतर रक्षासूत्र बंधन सोहळा झाला. सर्व कार्यकर्त्यांच्या हातात रक्षासूत्र बांधून त्यांना हिंदू संस्कृती, धर्म आणि राष्ट्राच्या रक्षणाची शपथ दिली.
बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कृष्णा धुळपणावर, गोरक्षक जिल्हाध्यक्ष दिनेश गावडे, सकल हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे, दादू रायका, हितेन नाईक, स्वागत नाटेकर, चिन्मय रानडे, गंधर्व राऊत, साईराज नार्वेकर, पंडित दादा मोडक, अॅड. देवदास शिंदे, अनिरुद्ध भावे, विवेक वैद्य, आनंद प्रभू, सुनील सावंत, शुभम हिर्लेकर, संकल्प धारगळकर, अथर्व केसरकर, पंकज तुळसुलकर, सागर ढंबे, ऋतिक कोरगावकर, तेजस मेस्त्री, आर्य गावडे, अॅड. पलास चव्हाण, प्रथमेश गावडे, तेजस भांबुरे, निलय धुरी, धनू मोरजकर, अनिरुद्ध सावंत, नंदन उपरकर, ओंकार सावंत, आकाश सासोलकर, केयूर नार्वेकर, चिरायू टोपले, अखिल मांजरेकर, गौतम देसाई, गोशाळा चालक पीयूष टिळवे, आनंद वारंग आदी उपस्थित होते.
-------
संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने
आयोजकांनी सांगितले, ‘हिंदू संस्कृतीचे रक्षण, राष्ट्रनिष्ठेचा प्रसार आणि युवा पिढीमध्ये धर्माभिमान जागवणे हेच उद्दिष्ट आहे. धर्म केवळ कर्मकांडापुरता मर्यादित नसून, तो सामाजिक आणि राष्ट्रहिताचा मार्गदर्शक आहे.’ कार्यक्रमात सावंतवाडी परिसरातील अनेक महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलेही सहभागी झाली. पूजेसाठी आवश्यक साहित्य स्वतः घेऊन आलेल्या महिला विशेष लक्षवेधी ठरल्या. यज्ञानंतर महाप्रसादाचे वाटप केले. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांमुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.