शिवसेना सरपंच संघटनेच्या मालवण प्रमुखपदी वाक्कर

शिवसेना सरपंच संघटनेच्या मालवण प्रमुखपदी वाक्कर

Published on

80079

शिवसेना सरपंच संघटनेच्या
मालवण प्रमुखपदी वाक्कर

मालवण, ता. २६ : शिवसेना सरपंच संघटना मालवण तालुकाप्रमुखपदी देवली सरपंच श्यामसुंदर वाक्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार नीलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी नियुक्तीपत्र दिले. आमदार राणे यांनी श्री. वाक्कर यांचा सत्कार केला.
नियुक्तीपत्रात म्हटले आहे, ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या मालवण तालुका सरपंच संघटना प्रमुखपदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे. या नियुक्तीचा कालावधी एका वर्षाचा असेल. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल. तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे.’ यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे, शहरप्रमुख दिपक पाटकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, युवासेना जिल्हाप्रमुख मेहुल धुमाळे, मंदार लुडबे आदी उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com