आरएसपीएममध्ये माहिती फलकांनी वर्गांची सजावट

आरएसपीएममध्ये माहिती फलकांनी वर्गांची सजावट

Published on

- rat२६p१६.jpg-
P२५N८००८७
राजापूर ः टाकाऊतून तयार करण्यात आलेली टिकावू वस्तू.
- rat२६p१७.jpg, rat२६p१८.jpg -
५N८००८८
राजापूर ः हस्तलिखित माहिती फलकांनी वर्गखोल्यांची विद्यार्थ्यांनी केलेली सजावट.

काही सुखद-------लोगो

‘आरएसपीएम’मध्ये माहिती फलकांनी वर्गांची सजावट
कृतियुक्त आनंददायी शिक्षण ; लवकरच वर्ग सजावट स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २६ः शहराजवळील आरएसपीएम इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील विविध विषयांवर आधारित माहिती फलकासह अन्य उपकरणे-साहित्य तयार करून त्याच्या साह्याने वर्गांची सजावट केली आहे. त्या द्वारे आरएसपीएम इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी कृतियुक्त आनंददायी शिक्षणही घेत आहेत.
पाठ्यपुस्तकातील धडा वा विषय शाळेमध्ये शिक्षकांनी शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांकडून उजळणी अभ्यास केला जातो. शिक्षकांनी जे शिकवले त्या विषयाचे ज्ञान विद्यार्थ्यांना धड्यातूनच मिळते. विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील तो धडा वा विषय अभ्यासताना त्यावर आधारित माहितीफलक वा उपकरण स्वतः तयार केल्यास संबंधित विषयाचे आकलन होण्यास मदत होते. हीच बाब ओळखून आरएसपीएम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना कृतियुक्त आंनददायी शिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत प्रशालेतील विद्यार्थ्यांनी पाठपुस्तकातील विविध विषयांवर आधारित माहितीफलक तयार केले आहेत. त्याचवेळी विविध उपकरणे वा साहित्यही स्वतः तयार केले आहे. तयार केलेल्या माहिती फलकांच्या साह्याने अध्यापन करताना प्रशालेतील वर्गखोल्यांचीही विद्यार्थ्यांनी सजावट केली आहे. माहिती फलकांच्या सजावटीने वर्गखोल्यांचे रूपडे पालटले आहे. विद्यार्थ्यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे प्रशालेचे मुख्याध्यापक नीलेश पवार आणि सहकारी शिक्षकांनी कौतुक केले आहे. या उपक्रमाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने वर्गसजावटीची स्पर्धा घेण्यात येणार असून, विजेत्यांना आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com