बापट महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती

बापट महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती

Published on

rat२६p२०.jpg-
२५N८००९५
रत्नागिरी ः तालुक्यातील वाटद-खंडाळा येथील बापट महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मान्यवर सोबत विद्यार्थी.

बापट महाविद्यालयात कायदेविषयक जागृती
विधी सेवा प्राधिकरण; बालकांसाठी विधी सेवा पुरवणारे पथक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ ः येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे तालुक्यातील वाटद-खंडाळा येथील श्रीमती पार्वती शंकर बापट काशिनाथ महाविद्यालयात विविध कायद्यांबाबत साक्षरता कार्यक्रम उत्साहात झाला.
वाटद येथे झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव आर. आर. पाटील, महाविद्यालयाचे उपाध्यक्ष आढाव, सचिव बोरकर, मुख्याध्यापक जगताप यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व लोकअभिरक्षक कार्यालयातील वकील उन्मेष मुळये उपस्थित होते. या वेळी मुळये यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणचा बालकांबाबतची योजना २०२४ विषयी मुलांना माहिती दिली. तसेच बालकांचे हक्क, शिक्षणाचा हक्क याविषयी मुलांना मार्गदर्शन केले. विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी मनोगतात बालकांविषयी असलेल्या कायदेविषयक तरतुदींबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. बाल न्यायमंडळ, जिल्हा बालकल्याण समिती यांचे कार्य, विधी संघर्षित बालक, काळजी व संरक्षणाची गरज असलेले बालक या विषयी तरतुदींची माहिती दिली. बालकांवरील अन्याय, अत्याचार निवारण करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे बालकांसाठी विधी सेवा पुरवणारे पथक स्थापन झाल्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. अस्पृश्यता निवारणाबाबतीत जातीभेद न पाळण्याचे व धार्मिक विद्वेष न वाढवण्याची जबाबदारी सर्व नागरिकांची असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com