शिडवणे शाळेची वर्षा सहल उत्साहात

शिडवणे शाळेची वर्षा सहल उत्साहात

Published on

80111

शिडवणे शाळेची वर्षा सहल उत्साहात
तळेरे, ता. २६ ः जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, शिडवणे क्रमांक १ या शाळेची वर्षा सहल कणकवली आणि वैभववाडीच्या सीमेवरील निसर्गरम्य नापणे-शेर्पे धबधब्यावर उत्साहात झाली.
यावेळी माजी वित्त व बांधकाम सभापती रवींद्र जठार, राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त विजय टक्के, शिक्षणतज्ञ मनोहर कोकाटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश रांबाडे आणि माऊली वारकरी संप्रदायाचे बाबा टक्के आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सर्व मुलांना खाऊचे वाटप केले. शाळेतील उपशिक्षक सीमा वरुणकर, दीपक काळेल आणि सुरेंद्र यादव हेदेखील याप्रसंगी उपस्थित होते. मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी सर्व उपस्थित मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. या वर्षा सहलीमध्ये शाळेतील सुमारे ३० विद्यार्थी, सर्व शिक्षक आणि इतर पदाधिकारी सहभागी झाले होते. अध्यक्ष दिनेश रांबा
डे यांनी वर्षा सहलीच्या प्रवासाचा सर्व खर्च केल्याबद्दल शाळेतर्फे त्यांचे आभार मानले.

Marathi News Esakal
www.esakal.com