चिपळूण ः गाणे ठरली महिलास्नेही ग्रामपंचायत
- ratchl२६१.jpg
80148
चिपळूण ः गाणे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व अधिकारी.
गाणे ठरली महिलास्नेही ग्रामपंचायत
राज्यस्तरावर दखल; महिलांसाठी नियोजनबद्ध उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ ः तालुक्यातील गाणे ग्रामपंचायतीने महिलांसाठी राबवलेल्या विविध उपक्रमांची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली. त्यानुसार गाणे ग्रामपंचायतीची महिलास्नेही ग्रामपंचायत म्हणून निवड झाली आहे. जिल्ह्यातून प्रथमच आणि या एकमेव ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली असून, या गावात वर्षभरात महिलांसाठी विविध नियोजनबद्ध उपक्रम राबवले जाणार आहेत.
महिलांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी गाणे ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार गावातील महिलांना बचतगटात सहभागी करून त्यांना आर्थिक साक्षरता व स्वावलंबनासाठी मदत, एनआरएललएम, मनरेगा व स्टार्टअप् योजनांच्या माध्यमातून महिलांना व्यवसायासाठी प्रोत्साहन, पंचायत पातळीवर लिंग समानता संसाधन केंद्र स्थापन, बालविवाह प्रतिबंध आणि लिंग आधारित हिंसाचार विरोधात विशेष उपक्रम ग्रामपंचायतीने राबवले आहेत. महिलांसाठी राबवलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत जिल्ह्यातून प्रथमच गाणे ग्रामपंचायतीची निवड महिलास्नेही ग्रामपंचायत म्हणून करण्यात आली.
राज्यात ३४ जिल्ह्यातून प्रत्येकी एक अशी ग्रामपंचायतींची निवड झाली. निवड झालेल्या गाणे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना यशदा प्रशिक्षण प्रबोधिनी प्रशिक्षण देण्यात आले. या पार्श्वभूमीवर गाणेच्या सरपंच अर्चना दिनेश गजमल म्हणाल्या, आमचा गाव महिलास्नेही ग्रामपंचायत झाल्याचा सर्व ग्रामस्थांना अभिमान आहे. यापुढील काळात महिलांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. महिलासुरक्षा, रक्षाबंधन, ज्येष्ठ महिलांच्या सुनांना मार्गदर्शन शिबिर, दिव्यांग महिलांसाठी खास शिबिरे, महिला शेतकऱ्यांना मदत आणि मार्गदर्शन, डिजिटल साक्षरता अभियान, महिलांसाठी शौचालय, आरोग्यसेवा, मासिक पाळी व्यवस्थापन, महिला मदतकक्ष अशा विविध टप्प्यांवर काम केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीत बैठक घेऊन त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी सरपंच अर्चना गजमल, उपसरपंच बाबाराम गजमल, माजी सरपंच निवृत्ती गजमल, सदस्य गणेश गजमल, सायली गजमल, ग्रामपंचायत अधिकारी रामेश्वर मसलकर, ग्रामपंचायत अधिकारी मंगेश पिंगळे, कर्मचारी संतोष निकम उपस्थित होते.
...........
चौकट
आदर्श महिलास्नेही मॉडेल गाव
रत्नागिरी जिल्ह्यातून गाणे गावची महिलास्नेही ग्रामपंचायत म्हणून निवड झाल्याने हे गाव हे जिल्ह्यासाठी आदर्श महिलास्नेही गाव मॉडेल म्हणून करावयाचे आहे. त्यासाठी सरपंच अर्चना गजमल, उपसरपंच बाबाराम गजमल, ग्रामपंचायत अधिकारी रामेश्वर मसलकर, गटविकास अधिकारी उमा घार्गे-पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) व गावासाठी एक प्रवीण प्रशिक्षक म्हणून चैताली शेलार यांना गावात वर्षभर उपक्रम राबवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.