स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा फडकेल

स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा फडकेल

Published on

- rat२६p२८jpg-
P२५N८०११४
रत्नागिरी ः स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री डॉ. उदय सामंत.

‘स्थानिक स्वराज्य’वर महायुतीचा
भगवा फडकेल ः उदय सामंत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता २६ : अल्पसंख्याक बांधव आमच्याबरोबर आहेत, हे आज पुन्हा एकदा पडवे (ता. गुहागर) गावातील अल्पसंख्याक बांधवांनी शिवसेनेत प्रवेश करून दाखवून दिले. केंद्रात किंवा राज्यातील सरकार जातपात पाहून विकास करत नाही तर सर्वांना समान संरक्षण देत आले आहे. या प्रवेशामुळे गुहागरातील शिवसेनेची ताकद वाढली असून, आगामी निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेना आणि महायुतीचा भगवा फडकेल, असा विश्वास पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केला.
गुहागर तालुक्यातील पडवे येथील अनेक अल्पसंख्याक बांधवांसह विविध समाजातील कार्यकर्त्यांनी रत्नागिरीतील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी ते बोलत होते. राजेश बेंडल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत भविष्यातील राजकीय वाटचालीचे संकेत दिले. या वेळी माजी आमदार सुभाष बने, बाबू म्हाप, तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, उपतालुकाप्रमुख संतोष साखरकर, तुकाराम निवाते, शिरीष चव्हाण, हुमणे गुरूजी, शहरप्रमुख नीलेश मोरे आदी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, लाडकी बहीण योजनेमध्ये अल्पसंख्याक बहिणींचाही समावेश आहे. त्यांच्याबाबतीत कोणताही दुजाभाव केलेला नाही. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकविणार हे निश्चित आहे. त्यासाठी मित्रपक्षांमधील गैरसमज दूर व्हायला पाहिजेत आणि केवळ कोणालातरी विरोध म्हणून प्रवेश नसावा.

चौकट
आमदार जाधव विकासाच्या पाठीशी
गुहागर मतदार संघातील काही लोक सध्या विरोधी वातावरण तयार करत आहेत. विकासकामात अडथळे आणत आहेत; मात्र येथील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी विकासकामांना कधीच विरोध केला नाही. ते नेहमीच विकासाच्यामागे उभे राहिल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com