-नऊ हजार जणांनी पुसला असाक्षरतेचा कलंक
रत्नागिरीची निकाल ९९.४४ टक्के
नऊ हजार ८०० उत्तीर्ण ; उल्लास साक्षरता कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ ः उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमात मागील आर्थिक वर्षात म्हणजेच २०२४-२५ मध्ये रत्नागिरी जिल्ह्याने चांगली कामगिरी केली आहे. उल्लास परीक्षेचा राज्याचा निकाल ९८.७५ टक्के लागला आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९९.४४ टक्के लागला आहे.
कोल्हापूर विभागात कोल्हापूरसह सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. दहावी व बारावी बोर्ड परीक्षा, पाचवी व आठवी शिष्यवृत्ती, एनएमएमएस शिष्यवृत्ती, राष्ट्रीय संपादणूक सर्व्हे, आधार नोंदणी व पडताळणी, अपार नोंदणी, पीजीआय यासह शिक्षण विभागातील बहुतांश मापदंडात कोल्हापूर विभाग राज्यात पुढे आहे. राज्य योजना कार्यालयाच्या सततच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा व तालुकास्तरावरील समित्यांच्या सक्रिय भूमिकेमुळे उल्लासमधील असाक्षर नोंदणीचे, परीक्षेला बसवण्याचे राज्यस्तरावरून देण्यात आलेले उद्दिष्ट सर्वच जिल्ह्यातून पूर्ण करण्यावर भर दिला आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी (योजना) यांची तर तालुकास्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे. जिल्हानिहाय विचार करता विभागात रत्नागिरी वगळता उर्वरित चारही जिल्ह्यांनी लक्ष्यभेदी कामगिरी केली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात उल्हास योजनेसाठी ९ हजार ३३७ नोंदणीचे आणि १२ हजार ९४ परीक्षेला बसवण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात ७ हजार ९८२ नोंदणी झाली तर परीक्षेला ९ हजार ८५५ इतकेच लोकं परीक्षेला बसले. त्यापैकी ९ हजार ८०० इतके उत्तीर्ण झाले आहेत. केवळ ५५ असाक्षरांना सुधारणा आवश्यक, असा शेरा प्राप्त झाला आहे. उत्तीर्ण झालेल्या नवसाक्षरांचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी वैदेही रानडे, योजना शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी अभिनंदन केले आहे.
----
कोट
उल्लास योजनेने आता सर्वत्र गती घेतली आहे. अद्यापही मोठा पल्ला गाठायचा आहे. नवसाक्षरांचे निरंतर शिक्षण सुरू राहण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.
- राजेश क्षीरसागर, विभागीय समन्वयक उल्हास
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.