महिलांचे सशक्तीकरण हेच ध्येय
80286
महिलांचे सशक्तीकरण हेच ध्येय
प्रियांका हरमलकर ः बांद्यात ‘इनरव्हील क्लब’चे पदग्रहण
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २७ ः महिलांसाठी नवनवे उपक्रम राबवून क्लबचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा माझा प्रयत्न असेल. सर्वांच्या सहकार्याने हे शक्य होईल, असे प्रतिपादन बांदा इनरव्हील क्लबच्या नवनिर्वाचित अध्यक्ष प्रियांका हरमलकर यांनी केले.
येथील इनरव्हील क्लबचा २०२५-२६ या वर्षासाठीचा पदग्रहण सोहळा श्री स्वामी समर्थ हॉल, बांदा येथे नुकताच झाला. या कार्यक्रमात सावंतवाडी इनरव्हील क्लबच्या सुमेधा धुरी यांनी नवे पदाधिकारी जाहीर केले. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. पल्लवी जोशी व डॉ. बाड उपस्थित होत्या.
नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी प्रियांका हरमलकर, सचिव निनता गोवेकर, खजिनदार अक्षता साळगावकर, आंतर क्लब अधिकारी चित्रा भिसे आणि माहिती अधिकारी म्हणून माधवी गाड यांनी आपापल्या जबाबदाऱ्या स्वीकारत पदग्रहण केले. यावेळी कार्यकारिणी सदस्य रुपाली शिरसाट, माजी अध्यक्षा अर्चना पांगम, श्वेता येडवे, श्रुती वळंजू, राखी कळंगुटकर व मृणाल तोरसकर उपस्थित होत्या. भक्ती आळवे यांचा नवीन सदस्य म्हणून क्लबमध्ये प्रवेश झाला.
माजी अध्यक्षा अर्चना पांगम यांनी आपल्या भाषणात मागील वर्षभरातील कामांचा आढावा घेतला. अध्यक्षीय काळात क्लबने महिलांसाठी अनेक चांगले उपक्रम राबविल्याचा आनंद आहे. नवीन कार्यकारिणीने देखील हे काम नव्या जोमाने पुढे न्यावे, असे आवाहन त्यांनी केले. नूतन अध्यक्षा हरमलकर यांनी, संस्थेने ठेवलेल्या विश्वासाबद्दल सर्वांची ऋणी आहे. क्लबतर्फे महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी रानभाजी पाककला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत एकूण ११ महिलांनी सहभाग घेतला. यामध्ये प्रथम साक्षी आमोरेसरकर, द्वितीय शिल्पा धामापूरकर, तिसरे बक्षीस प्रणिता पडवळ यांना तर उत्तेजनार्थ बक्षीस अर्चना महाले व वर्षा आगलावे यांना मिळाले. खजिनदार अक्षता साळगांवकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.