तुळसुलीत विद्यार्थ्यांना ‘इनरव्हील’तर्फे फळझाडे
(फोटो एक कॉलम वापरा)
80506
तुळसुलीत विद्यार्थ्यांना
‘इनरव्हील’तर्फे फळझाडे
कुडाळ ः इनरव्हील क्लब ऑफ कुडाळकडून श्री लिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तुळसुली येथे फळझाडांचे रोपण अध्यक्षा सानिका मदने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना फळझाडे वितरित करण्यात आली. इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ अध्यक्षा सानिका मदने, सचिव सई तेली, पीडीसी डॉ. सायली प्रभू, ऋतुजा परब, स्वप्नाली साळगावकर, मनाली नाईक, पालक सदस्य प्रवीण वारंग आदी उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत चाफा, पेरू, सुपारी, आंबा, कोकम, फणस आदी रोपांचा समावेश होता.
.................
80507
चेंदवणकर कुटुंबीयांना
शिवसेनेकडून मदत
कुडाळ ः चेंदवण आंबेडकरनगर येथील अनंत चेंदवणकर यांच्या घरावर फणसाचे झाड पडून नुकसान झाले. चेंदवणकर हे आजारग्रस्त असून सध्या घर दुरुस्तीसाठी तत्काळ मदतीची गरज असल्याचे समजताच शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी चेंदवणकर यांच्या पत्नीकडे आर्थिक मदत सुपूर्द केली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, दशावतार राज्य कमिटी सदस्य देवेंद्र नाईक, शिवसेना नेरुर विभाग प्रमुख किशोर सावंत, संदेश नाईक आदी उपस्थित होते.
जानवलीत जनावरांचे
लसीकरण शिबिर
कणकवली ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संलग्न ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ अंतर्गत कार्यरत राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी जानवली गावात जनावरांसाठी लसीकरण शिबिर झाले. ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत या शिबिरामध्ये जनावरांमध्ये लंपी त्वचारोगासारख्या आजारांपासून संरक्षणासाठी लसीकरण करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजित कृष्णा मळीक यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहीम राबवण्यात आली. यावेळी त्यांनी पावसाळ्यात जनावरांमध्ये होणाऱ्या विविध आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक उपाययोजनांची माहितीही त्यांनी दिली. उपसरपंच किशोर राणे आदींचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांमध्ये देवराज निंबाळकर, सिद्धेश पताडे, सार्थक डोणे, अथर्व भोवर, प्रथमेश परब, अतुल शिंदे, ओम भांगरे व अभिनव पाटील यांनी विशेष मेहनत घेतली. तर विद्यार्थ्यांना प्राचार्य श्री. संते तसेच कार्यक्रम समन्वयक आणि विषय श्री. मोटे यांचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.