वाघेरीत साखर कारखान्याची उभारणी करा
80483
वाघेरीत साखर कारखान्याची उभारणी करा
ग्रामविकास मंडळाची मागणी; पालकमंत्र्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २८ : वाघेरी आणि लगतची गावे कृषी संपन्न आहेत. इथे ऊस शेती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे वाघेरी गावात साखर कारखान्याची उभारणी करा, अशी मागणी वाघेरी ग्रामविकास मंडळाने केली आहे. तसेच या पंचक्रोशीत कुर्ली-घोणसरीचे पाणी होण्यासाठी कालव्याचे नियोजन करावे, अशीही मागणी करण्यात आली.
वाघेरी ग्रामविकास मंडळ, मुंबईच्या पदाधिकारी व सदस्यांनी मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांची मुंबईतील जुहू निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ग्रामविकासाच्या विविध मागण्यांचे निवेदनही त्यांना सादर केले. या सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून वाघेरी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री राणे यांनी दिले.
या शिष्टमंडळामध्ये वाघेरी ग्रामविकास मंडळ, मुंबईचे अध्यक्ष प्रमोद रावराणे, उपाध्यक्ष दत्तात्रेय रावराणे, सचिव डॉ. संतोष रावराणे, खजिनदार सूर्यकांत गुरव, सल्लागार व्यंकटेश रावराणे, तसेच सदस्य हर्षल रावराणे, मनोज रावराणे, मुकेश रावराणे, महेंद्र रावराणे, जयेश रावराणे, विलास रावराणे, सुनील रावराणे, अनिल मोंडकर, समीर रावराणे, गणेश रावराणे, बाळकृष्ण वाघेरकर आदींचा समावेश होता.
मंडळातर्फे दिलेल्या निवेदनात वाघेरी गावात साखर कारखाना उभारण्याची मागणी करण्यात आली. जिल्ह्यात साखर कारखाना नसल्यामुळे शेतकऱ्यांना ऊस वाहतुकीसाठी कोल्हापूर, राधानगरी, गगनबावडा येथील कारखान्यांवर अवलंबून राहावे लागते. यामुळे दर कमी मिळतो आणि ऊस वेळेवर उचलला जात नाही.
-----
धरणाचे पाणी पोचलेच नाही!
कुर्ली - घोणसरी धरणाचे पाणी कालवा बांधून अजून गावात पोहोचलेले नाही. यामुळे शेतीसाठी पाण्याची टंचाई आहे. कालवा बांधण्याची मागणी करण्यात आली. मोना वहाळातील गेल्या १५-२० वर्षांपासून सिलीका धुतल्याने वहाळातील पाणी रासायनिक झाले आहे. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. या परिसरातील गाळ उपसा करून पाण्याचे स्त्रोत पूर्ववत करावेत. गावात उभारण्यात येणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगार संधी द्याव्यात आदी मागण्या केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.