सिंधुदुर्ग जिल्हा ‘एआय’द्वारे गतिमान करू

सिंधुदुर्ग जिल्हा ‘एआय’द्वारे गतिमान करू

Published on

80484

सिंधुदुर्ग जिल्हा ‘एआय’द्वारे गतिमान करू

पालकमंत्री राणे ः सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेतील गुणवंतांचा सत्‍कार

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २८ : ‘जगातील अनेक देश शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरत आहेत. भारतात सिंधुदुर्ग हा एआयचा वापर करणारा पहिला जिल्हा ठरला आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी ‘एआय’चा प्रभावी वापर करून सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासकीयदृष्ट्या सर्वांत गतिमान बनविणार आहे, अशी ग्‍वाही पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिली.
येथील भगवती मंगल कार्यालयात युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिधुरत्न टॅलेंट परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा झाला. यात श्री.राणे बोलत होते. यावेळी जिल्‍हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, अध्यक्षा सौ. संजना सावंत, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, माजी पंचायत समिती सदस्य राजू पेडणेकर आदी उपस्थित होते.
सीईओ खेबुडकर यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी लहानपणापासून सुरू करावी, असे सांगून प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौतुक केले. ‘युवा संदेश’ ही महाराष्ट्रातील अशी पहिली संस्था आहे जी वर्षभरात १०० दिवस उपक्रम राबवते,’ असे ते म्हणाले.
संस्थेचे संस्थापक संदेश सावंत म्हणाले, ‘माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडून ‘८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण’ ही शिकवण घेऊन काम करतो. ही परीक्षा आता रत्नागिरी, पालघर जिल्ह्यांमध्येही घेतली जाते. यशस्वी आयोजनामध्ये शिक्षकांचे योगदान मोलाचे आहे.’ बाबुशेठ कोरगावकर, दिव्या बाणे यांना ‘युवा संदेश’ आदर्श पुरस्कार देण्यात आला. इस्रोच्या सफरीस गेलेल्या विद्यार्थिनींनी आपल्या अनुभवांचा उहापोह केला. सुशांत मर्गज यांनी प्रास्ताविक केले. संदीप तांबे यांनी आभार मानले.
---
दर्जेदार शिक्षण घ्या!
राणे म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर न थांबता विकसित देशांतील दर्जेदार शिक्षणाचा आदर्श घ्यावा. युवा संदेश प्रतिष्ठानचे उपक्रम शैक्षणिक, सामाजिक व आरोग्य क्षेत्रात स्तुत्य आहेत. सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेमुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा पाया मजबूत होत आहे. प्रतिष्ठानने एआयसंदर्भात नवा उपक्रम राबवावा, त्याला माझे सहकार्य राहील.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com