आठवडा बाजारात रानभाज्यांची विक्री

आठवडा बाजारात रानभाज्यांची विक्री

Published on

- rat२८p१४.jpg :
२५N८०४८७
सावर्डे: आठवडा बाजारात रानभाज्या विक्रीसाठी बसलेल्या महिला. (अशोक कदम, सकाळ छायाचित्रसेवा)

सावर्डे बाजारात रानभाज्यांची विक्री
खरेदीसाठी गर्दी; स्थानिकांना रोजगाराचे साधन
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. २८ : श्रावण महिना सुरू झाला असून, सावर्डे परिसरातील आठवडा बाजारात रानभाज्या विक्रीला आल्या आहेत. स्थानिक बाजारपेठेत विविध प्रकारच्या ताज्या व औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांची रेलचेल असून, खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
सावर्डे येथील आठवडा बाजार तसेच स्थानिक चौकात सकाळपासूनच मांडकी, दहिवली, डेरवण, कोंडमळा परिसरातील महिला विक्रेत्यांनी महामार्गाच्या बाजूला रानभाज्या विक्रीस ठेवल्या आहेत. पावसाळी हंगाम सुरू असल्यामुळे वनस्पती भरभरून उगवत आहेत. या काळात मिळणाऱ्या रानभाज्यांचे महत्त्व अधिकच वाढते. अळू, भोपळी, कवळा, रताळी, भूमिठा, सोनवेल, दर्जी, पडवळ, काकडी, कोंबड्या, पिठवट, गवती चहा, टाकळा, कळंब, रणमका, कुडुक, तेरडा, सुळफ, भेंडी, घोसाळे, माठ, अळू आदी भाज्या सहज उपलब्ध आहेत. नागपंचमी सणासाठी भूमिठा, सोनवेल या रानभाज्या नैवेद्यासाठी म्हणून केल्या जातात. या भाज्यांचे दर १० ते २० रुपयांपर्यंत जुडी तर काही दुर्मिळ भाज्या ५० रुपये किलोच्या घरात विक्रीला आहेत.
या रानभाज्यांना पारंपरिक कोकणी आहारात विशेष महत्त्व आहे. पचनासाठी उपयुक्त, थंडावा देणाऱ्या व विविध आजारांपासून बचाव करणाऱ्या या भाज्या ग्रामीण भागात पूर्वीपासूनच आहाराचा भाग राहिल्या आहेत. अनेक ग्रामीण महिला रानभाज्या तोडून विक्री करून घरखर्चासाठी त्यांचा हातभार लागतो.
-----
कोट
आठवडा बाजारात भाज्यांना चांगले ग्राहक मिळतात. या भाज्या अगदी तीन महिन्यांपर्यंत पिकवल्या जातात. गणेशोत्सव काळात तर दररोज भाजी विक्री केली जाते. त्याला स्थानिकांबरोबर मुंबईकर चाकरमान्यांची मोठी मागणी असते. भाजीविक्रीतून आलेले पैसे घरखर्चासाठी वापरायला मिळतात.

- विजया खांबे, मांडकी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com