बाप्पाच्या कृपेने राज्यात पुन्हा भगवा फडकेल

बाप्पाच्या कृपेने राज्यात पुन्हा भगवा फडकेल

Published on

- rat२८p९.jpg-
P२५N८०४७७
पर्यावरणपूरक शाडूमातीच्या गणेश स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करताना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, तालुकाप्रमुख सुरेश आदींसह पदाधिकारी.

बाप्पाच्या कृपेने राज्यात भगवा फडकेल
रवींद्र डोळस ः लांजा येथे गणेशमूर्ती बनवण्याची स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २८ ः ज्या हाताने गणपतीची मूर्ती साकारली आहे ते हात कधीही विद्ध्वंसक कृत्य करणार नाहीत. लहान मुलांना या वयातच संस्कार आणि चांगले विचार देण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली आहे. गणपती बाप्पा शिवसेनेवरील सर्व विघ्न दूर करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उदंड व निरोगी आयुष्य देईल आणि राज्यात पुन्हा एकदा भगवा फडकेल, असा विश्वास शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस यांनी व्यक्त केला.
लांजा येथे आयोजित पारितोषिक वितरण कार्यक्रमावेळी ते बोलत होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना पक्षाच्यावतीने जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांच्या संकल्पनेतून तालुकास्तरीय पर्यावरणपूरक शाडूमातीच्या गणेशमूर्ती साकार करण्याची स्पर्धा शिवसेना लांजा तालुका कार्यालय येथे घेण्यात आली होती. या प्रसंगी तालुकाप्रमुख सुरेश करबेळे, महिला तालुका संघटिका पूर्वा मुळे, नितीन शेटे, अमोल रेडीज, संदेश कांबळे, किरण बेर्डे, नितीन जंगम, सिद्धेश यादव, राजेंद्र सुर्वे आदी उपस्थित होते.
स्पर्धेत लहान गटात गंधर्व धावडे (शिपोशी) यांनी प्रथम तर सार्थक खुलम (वेरवलीखुर्द) याने द्वितीय व विधी पातेरे (लांजा) हिने तृतीय क्रमांक मिळवला तर उत्तेजनार्थ म्हणून मनस्वी जाधव (कोट) आणि परिणीती जाधव (शिरवली) यांचा गौरव करण्यात आला. मोठ्या गटात दुर्वेश पांचाळ (भांबेड), पार्थ जाधव (लांजा), सार्थक मोसमकर (वेरवली) यांनी यश मिळवले. उत्तेजनार्थ म्हणून कावेरी पांचाळ व प्रथमेश खामकर यांची निवड करण्यात आली. या सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धेसाठी तालुक्यातील १००हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवासेनेचे संतोष रेवाळे यांनी केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com