मेहनतीच्या बळावर ध्येय साध्य करा
80503
मेहनतीच्या बळावर ध्येय साध्य करा
बाळकृष्ण परबः पिंगुळी-शेटकरवाडीत विद्यार्थी गुणगौरव सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २८ः प्रत्येक क्षेत्रात आज स्पर्धा आहे. या स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित केले पाहिजे. येणाऱ्या आव्हानांना सामोरे गेले पाहिजे. शासकीय नोकऱ्या भरपूर आहेत; पण ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन कुडाळ तालुका पंचायत समितीचे माजी गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब यांनी गुणवंत विद्यार्थी सोहळ्यात पिंगुळी शेटकरवाडी येथे केले. दहावी, बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंतांचा गौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
जीवनविद्या मिशनचे प्रसारक सुनील पालव यांच्या पिंगुळी-शेटकरवाडी येथील निवासस्थानी दहावी, बारावी उत्तीर्ण विदयार्थ्यांचा कौतुक सोहळा झाला. यावर्षीचा हा चौथा सोहळा होता. यावेळी सद्गुरू वामनराव पै यांचे शिष्य प्रबोधक संदीप परब, सेवा निवृत्त गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब, ज्येष्ठ ग्रामस्थ प्रमोद धुरी, जयवंत गावडे, माजी सैनिक सूर्यकांत पालव, सतीश गावडे, प्रसाद दळवी, रुपेश धुरी, राऊळ महाराज संस्थान पिंगुळीचे राजेश राऊळ, कुडाळ जीवनविद्या मिशनचे अध्यक्ष मधुकर सावंत, निलांबरी पालव, नीलेश कदम, विश्वजित पालव, सयाजी मोर्ये, रामदास आगलावे, लवू पालव, अंकुश पालव उपस्थित होते.
श्री. परब म्हणाले "सद्गुरू वामनराव पै यांचे जीवन विद्या मिशन संस्कारमय जीवन जगण्यासाठी सर्वांना मार्गदर्शक आहे. दहावी, बारावीनंतर पुढे काय करावे, याचा विचार विद्यार्थ्यांनी आताच करावा. नोकरीच्या अनेक संधी आहेत, पण त्या प्राप्त करताना जिद्द, चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वास आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आहे, पण दहावी, बारावीनंतर पुढे काय? याबाबत मात्र अद्यापही प्रश्नचिन्हच आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येकाने यूपीएससी, एमपीएससी आदी क्षेत्रांमध्ये वाटचाल करावी."
संदीप परब यांनी जीवनामध्ये माणूस बनणे हेच ध्येय ठेवून यासाठी संस्कार व योग्य शिकवण महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे आयोजन सुनील पालव, प्रसाद दळवी परिवाराच्या वतीने करण्यात आले. यावेळी ३२ गुणवंत विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन सुनील पालव यांनी केले.
चौकट
गौरव गुणवंतांचा
दहावी, बारावी परीक्षेत सुयश संपादन केलेल्या गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गुणगौरव करण्यात आला. यामध्ये इयत्ता बारावीतील अनुष्का सावंत, तेजल पिंगळकर, वल्लभ सावंत, पार्थ सावंत, दीपस्वी पालकर, प्रीती सावंत, केतन पालव, साक्षी गावडे, साईश गावडे, प्रणव सावंत, तनिषा दळवी, दहावीतील यशस्वी निधी सावंत, जान्हवी मोर्ये, कुणाल पालकर, अनुष्का सावंत, गौरव राऊळ, ऋतुराज गोसावी, भक्ती परब, प्रथम दळवी, दक्षता पिंगुळकर, चंदना मुननकर, स्मृती पिंगुळकर, पूर्वा जळवी, स्नेहा जळवी, चिन्मय सामंत, कुणाल धुरी, रिया पार्सेकर, स्मृती पिंगुळकर, विशेष प्राविण्य रामचंद्र पेडणेकर (इंजिनिअर), आर्या आगलावे (स्पर्धा परीक्षा), दशरथ परब (ए.पी.जी. अब्दुल कलाम स्पर्धा परीक्षा), समर्थ आगलावे (बी.डी.एस.) परीक्षा, यश आगलावे या गुणवंतांचा समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.