शुभ्रा मिठबावकरचा कणकवलीत सत्कार
80498
शुभ्रा मिठबावकरचा
कणकवलीत सत्कार
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २८ः युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळोशी वरचीवाडीची तिसरीतील विद्यार्थिनी शुभ्रा मिठबावकर हिने सुवर्णपदक प्राप्त केले. तिच्या या यशाबद्दल कणकवली येथे भगवती मंगल कार्यालय सभागृहात पालकमंत्री नीतेश राणे, युवा संदेश प्रतिष्ठानचे संदेश सावंत, संजना सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत वीरेंद्र चिंदरकर यांच्या हस्ते सुवर्णपदक, प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन तिचा सन्मान करण्यात आला. तिच्या या यशाबद्दल परिसरातून कौतुक केले जात आहे. शुभ्राला मुख्याध्यापिका सौ. तेली, सौ. मुंडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
.....................
80499
आरोंदा ः येथील बाजारपेठेत नागाच्या मूर्त्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
नागमूर्ती खरेदीसाठी
आरोंदा बाजारात गर्दी
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. २८ ः श्रावणात सुरुवातीचा महत्वाचा सण म्हणजे ''नागपंचमी''. हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. हिंदू धर्मातील श्रद्धेचा हा सण असूनस या दिवशी मातीपासून बनविलेल्या नागाच्या मूर्तींचे घरोघरी पूजन केले जाते. नागदेवतेला पातोळ्यांचा नैवेद्य दाखवून त्याचे आशीर्वाद घेतले जातात. नागपंचमी हा सण श्रावण शुद्ध पंचमीला साजरा केला जातो. हा सण उद्या (ता. २९) साजरा होत आहे. यानिमित्त सद्या नागपंचमीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी दिसत आहे. नागाच्या मूर्ती बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. ग्राहक त्या खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. सध्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईची झळ सण-उत्सवांना बसत असली तरी कोकणात मोठ्या उत्साहाने नागपंचमी साजरी होणार आहे.