-विचारांची उंची वाढवण्यासाठी वाचन करा

-विचारांची उंची वाढवण्यासाठी वाचन करा

Published on

वाचनातून विचारांची उंची वाढवा
सुनील पांचाळ ः बुटाला महाविद्यालयात व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
गावतळे, ता. २८ ः आज वाचन बंद झालेलं आहे त्यामुळे ग्रंथसंपदा धूळखात पडली आहे. आपल्या विचारांची उंची वाढवायची असेल तर विद्यार्थ्यांनी वाचन केलं पाहिजे, असे प्रतिपादन सुनील पांचाळ यांनी केले.
ते कोकणभूमी शिवप्रतिष्ठान आणि जयश्री ताई जाधव-सावंत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मराठी भाषेचे अभिजात सौंदर्य’ या विषयावर व्याख्यानाप्रसंगी बोलत होते. श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज गावतळे येथे २७ जुलै रोजी हा कार्यक्रम झाला. या प्रसंगी पांचाळ म्हणाले, मराठी भाषेला ३ हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे. १३व्या शतक महत्त्वाचे आहे. कारण, या शतकात भाषेला उच्च पदाला नेण्यास अनेक संत आणि राजांनी प्रयत्न केले. आपण गणपतीपुळे येथे जातो; मात्र मालगुंड येथे केशवसुतांचे स्मारकात जात नाही, हे मराठी भाषेचं दुर्दैव आहे. माता आणि माती यामध्ये फक्त वेलांटीचा फरक आहे; पण दोघींचे कार्य एकच आहे. कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या दक्षिणेकडील राज्यात त्यांच्या भाषेतच बोलले जाते. शेतकरी शेतात धान्य पिकवतो म्हणून आपल्या ताटात येतं म्हणून जेवणापूर्वी शेतकऱ्याचे आभार मानले पाहिजे. बहिणाबाईंच्या कविता आचार्य अत्रे यांनी जगासमोर आणल्या. बहिणाबाईंच्या कविता त्यांच्या मुलाने लिहून ठेवलेल्या होत्या. श्रोता कसं व्हायचे, हे अर्जुनाने शिकवले तर वक्ता कसा व्हायचे हे श्रीकृष्णाकडून शिकावे, असे त्यांनी सांगितले.
या वेळी प्राचार्या भक्ती सावंत, एन. वाय. पवार, भरत दाभोळकर, शशिकांत शेलार, गटशिक्षणाधिकारी दापोली सांगडे, रूपेश जाधव, हर्षल मोरे, विलास भोसले, रमेश भैरमकर, विठोबा पवार, संजय पवार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com