चिपळूण-शिरगांव पंचक्रोशी स्मार्ट मिटरला कडाडून विरोध

चिपळूण-शिरगांव पंचक्रोशी स्मार्ट मिटरला कडाडून विरोध

Published on

80527

शिरगांव पंचक्रोशीचा
स्मार्ट मिटरला तीव्र विरोध
चिपळूण, ता. २८ ः तालुक्यातील शिरगांव येथील महावितरणच्या कार्यक्षेत्रातील १३ गावातील विजेच्या संबंधित नागरिकांकडून येणाऱ्या विविध अडचणी, समस्येसंदर्भात चर्चेचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते भरत लब्धे यांच्या माध्यमातून केले होते. बैठकीत ग्रामस्थांनी महावितरणच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला तसेच स्मार्ट मिटरबाबत सर्वांनी तीव्र भावना व्यक्त करत तो बसवण्यास कडाडून विरोध दर्शविला.
शिरगांव येथील बैठकीसाठी महावितरण चिपळूण ग्रामीणचे अधिकारी पाटणकर हे सहकाऱ्यांसमवेत उपस्थित होते. बैठकीत नवीन जोडणी, लाईनवरील झाडे तोडणे, धोकादायक खांब बदलणे, वारंवार वीज जाणे, चौकशी केली असता योग्य खुलासा न होणे, ठेकेदाराने कामे वेळेत न करणे, कामासाठीच्या निधीसाठी जिल्हा नियोजनकडे बोट दाखवणे, ग्रामपंचायत स्तरांवरील पाणीयोजनेच्या विजेच्या समस्या आदी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विजेची लाईन शिफ्टिंग किंवा इतर कामासाठी जिल्हा नियोजनकडे प्रस्ताव पाठवला जातो. तो मंजुरीला खूप विलंब होतो तोपर्यंत ते काम होत नाही. या काळात दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? ही कामे कंपनी आपल्या नफ्यातून का करत नाही, असा प्रश्न भरत लब्धे यांनी उपस्थित केला.
भाई शिंदे, प्रितम आंब्रे, नीलेश शिंदे, रफिक देवळेकर, संकेश पवार, लक्ष्मण जाधव यांनी चर्चेत सहभाग घेतला. उपकार्यकारी अभियंता पाटणकर तसेच सहाय्यक अभियंता तेजश्री उगारे यांनी कामात सुधारणा करण्यात येईल. तशा सूचना यानंतर होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बैठकीत केल्या जातील, असे सांगितले. मोठ्या दुरुस्तीसाठी वीज फार काळ जाणार असेल तर याची सूचना ग्रामस्थ व व्यापारी यांना दिली गेली पाहिजे. त्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुपचा वापर करावा. आता अनेकजण घरामध्ये ऑनलाईन कामे करत असतात. त्यांचे नुकसान होणार नाही याचीही दक्षता घेण्याची मागणी भरत लब्धे, भाई शिंदे, प्रितम आंब्रे यांनी केली.
बैठकीला शिरगाव सरपंच नीता शिंदे, कुंभार्ली सरपंच रवींद्र सकपाळ, नागावे सरपंच सुरेश साळवी, माजी सरपंच प्रकाश पालांडे, पिंपळी बु. सरपंच स्मिता राजवीर, कोळकेवाडीच्या माजी सरपंच अश्विनी साळवी, तळसर माजी सरपंच विजय साळुंखे, कोंडफणसवणे उपसरपंच संकेश पवार, श्रीधर शिंदे, केशव लांबे, लक्ष्मण जाधव, हरिश्चंद्र फुटक, चंद्रकांत भंडारे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com