सामंतांवरील टीका खपवून घेणार नाही
80552
सामंतांवरील टीका खपवून घेणार नाही
नरेश कोयंडे ः मोंडकर, तोरसकर हे ‘स्वयंघोषित’ नेते
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २८ : आमदार नीलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याकडे कोणतीही समस्या मांडल्यास ती तत्काळ सुटते. जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडविले जात असल्याने शिवसेनेकडे जनतेचा ओढा वाढत आहे. जिल्हाप्रमुख म्हणून दत्ता सामंत यशस्वी ठरत आहेत. त्यामुळेच बाबा मोंडकर, विकी तोरसकर यांच्यासारखे स्वयंघोषित नेते स्वतःचे अपयश लपवण्यासाठी त्यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करत आहेत. यापुढे सामंत यांच्यावर टीका केल्यास बंदर जेटीवरील स्टॉल व अन्य सर्व विषय बाहेर काढू; असा इशारा शिवसेनेचे दांडी शाखा प्रमुख नरेश कोयंडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.
तळाशील येथे समुद्री अतिक्रमणामुळे गावाचे दोन भाग होत होते, तेव्हा मोंडकर, तोरसकर कुठे होते? आतापर्यंत जनतेचे कोणते प्रश्न सोडविले हे जाहीर करावे. नुसतेच स्वतःला नेते म्हणवून घेऊ नये, असा सल्लाही कोयंडे यांनी दिला.
दत्ता सामंत जिल्हाप्रमुख असल्याने शिवसेना पक्ष वाढविणे हे त्यांचे कर्तव्य आहे. ते काम प्रामाणिकपणे ते करत आहेत. सोबत जनतेचे प्रश्न आमदार राणे यांच्या माध्यमातून सोडविले जात आहेत. सामंत विकासकामांची आश्वासने देतात आणि आमदार राणे ती पूर्ण करतात. याला ‘आमिष’ नाही तर ‘जनसेवा’ म्हणतात. मोंडकरांसारख्या स्वयंघोषित नेत्यांना विकास कधी समजलाच नाही. मालवण जेटीवर जो काही विकास केला, त्याबाबत आम्हाला बोलायला लावू नका.’
आमदार राणेंच्या नेतृत्वात गतिमान विकास होत आहे. ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे अनेक पक्षप्रवेश होत आहेत. त्यामुळे महायुती भक्कम होत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून सामंतांचे राजकीय वजन वाढत आहे. त्यामुळे डिपॉझिट जप्त झालेल्या व जिल्हापरिषद निवडणुकीत ५०० मतेही मिळू न शकलेल्या मोंडकर यांनी बेताल बडबड थांबवावी. विकी तोरसकर यांनीही खोटे बोलणे थांबवावे. सामंतांचे सामाजिक कार्य मोठे आहे. तळाशील येथील बंधारा उभारणी रुपाने ते जनतेने पुन्हा अनुभवले आहे. आमदार राणेंनेही त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.’ यावेळी मंगेश कोयंडे, अरुण तोडणकर, प्रवीण पराडकर, भाऊ मोरजे आदी उपस्थित होते.
---
भाजपने आत्मपरीक्षण करावे ः मोरजकर
भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना पदे दिली, ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाजपचे मालवण शहर मंडल अध्यक्ष बाबा मोंडकर व सहकाऱ्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यावर केलेल्या टिकेवरून माजी उपसभापती प्रसाद मोरजकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दत्ता सामंत महायुतीत मिठाचा खडा टाकतात, म्हणण्यापेक्षा लोक त्यांच्याकडे का जातात, भाजप म्हणून तुम्ही किती सक्षम आहात?, याचे या पदाधिकाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.