कोकण
गावखडीतील रामेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी
गावखडीतील रामेश्वर मंदिरात गर्दी
पावस, ता. २८ ः रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील जागृत देवस्थान श्री देव रामेश्वर मंदिर श्रावण महिन्यानिमित्त ओम नमः शिवाय गजराने दुमदुमत आहे. श्रीदेव रामेश्वराला दर्शन घेण्यासाठी श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी होत आहे. येथील रामेश्वर मंदिरात प्रत्येक सोमवारी रूद्राभिषेक, श्रावणी सोमवारी, शनिवारी दररोज आरती, ओम नमः शिवाय जप मंदिरात सुरू आहे.