मंडणगड - महामार्गाचे काम रखडल्याने संघर्ष समिती आक्रमक

मंडणगड - महामार्गाचे काम रखडल्याने संघर्ष समिती आक्रमक

Published on

80579

महामार्गाचे काम रखडल्याने संघर्ष समिती आक्रमक
उपोषणाचा इशारा; खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास, सूचनाफलकांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २८ः आंबडवे-लोणंद महामार्गावर राजेवाडी ते आंबडवेदरम्यानचे अंतरातील राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीचे काम तीन वर्षे रखडलेले असल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात मंडणगड तालुका संघर्ष समितीच्यावतीने प्रशासनास स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
समितीचे अध्यक्ष अरविंद येलवे, कार्याध्यक्ष भरत सरपरे, सल्लागार अभय पिचुर्ले, विश्वास सुखदरे, सदस्य अतुल पवार, महेंद्र येलवे, रमेश चिखलकर, सिंकदर बुरूड आदी पदाधिकाऱ्यांनी निवासी नायब तहसीलदार संजय गुरव यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन दिले. गेले तीन वर्षे मंडणगड तालुका संघर्ष समितीमार्फत राजेवाडी ते आंबवडे या मंडणगड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण स्थितीत असल्याबाबत प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देण्यात आले.
राष्ट्रीय महामार्गाचे काम खूप संथगतीने सुरू आहे. रस्त्याचे काम सुरू असता भिंगळोली, शेनाळे, चिंचाळी, पन्हळी, म्हाप्रळ, पाचरळ या गावांमध्ये जुन्या व नव्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे स्थानिकांना प्रवास करणे कठीण झाले आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी व चिखल साचल्यामुळे आणि खड्डे दिसत नसल्याने अनेक दुचाकीस्वारांचा अपघात झाला आहे. एसटीतून प्रवास करताना अनेक वृद्ध लोक असतात. त्यांना सुद्धा खड्ड्यांमुळे प्रवास करताना खूप त्रास होतो तसेच अपघातग्रस्त ठिकाणी सूचनाफलक सुद्धा लावण्यात आले नाहीत.
महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर आपणामार्फत योग्य ती कार्यवाही करून कंत्राटदाराचे नाव काळ्या सूचीत नोंदवावे. १० ऑगस्टपर्यंत रस्त्यावरील खड्डे डांबराने भरून देण्याचे काम कंत्राटदारामार्फत करावे आणि गरजेच्या ठिकाणी सूचनाफलक लावण्यात यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. कामे दिलेल्या वेळेत न झाल्यास १५ ऑगस्टला मंडणगड तालुका संघर्ष समितीमार्फत भिंगळोली येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही निवेदनात दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com