शिर्के प्रशालेत सायबर जागरुकता मोहीम

शिर्के प्रशालेत सायबर जागरुकता मोहीम

Published on

शिर्के प्रशालेत सायबर जागरूकता मोहीम
रत्नागिरी, ता. २९ : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या सायबर वॉरिअर क्लबतर्फे आणि क्विक हिल फाउंडेशनच्या सहकार्याने रा. भा. शिर्के प्रशालेत सायबर सुरक्षेसाठी सायबर शिक्षण ही सायबर मोहीम राबवण्यात आली. विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांबद्दल माहिती देणे, त्यांना डिजिटल जागरूक नागरिक बनवणे हा कार्यक्रमाचा उद्देश होता. कार्यक्रमात ओटीपी फसवणूक, गेमिंग फ्रॉड, सोशल मीडिया फसवणुकीसारख्या सायबर गुन्ह्यांवर आधारित माहितीपूर्ण सादरीकरण, संवादसत्र आणि प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले. यात क्लबचे सदस्य पार्वती रावल, संस्कृती जाधव, चिन्मय सुर्वे, सचिन राठोड, वैष्णवी शिरसाट, स्नेहा भिडे, वेदांग पाटणकर, राज गुरव, वैष्णवी गुरव, चिरायू चव्हाण, मिहीर सावंत, श्रेयस चव्हाण यांनी सायबर गुन्हे टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या सावधगिरीच्या उपायांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा शपथ घेतली आणि डिजिटल माध्यमात जबाबदारीने वागण्याची प्रतिज्ञा केली. शिर्के प्रशालेचे मुख्याध्यापक कांबळे यांनी या प्रसंगी या उपक्रमाचे कौतुक केले.

Marathi News Esakal
www.esakal.com