योगाभ्यास केल्यास निराशा, हव्यास संपेल

योगाभ्यास केल्यास निराशा, हव्यास संपेल

Published on

rat२९p७.jpg-
२५N८०७१५
रत्नागिरी : योगशिक्षक अनंत आगाशे लिखित मंत्र आरोग्याचा पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मार्गदर्शन करताना रमाताई जोग.
---
योगाभ्यासाने निराशा, हव्यास संपेल
रमा जोग ः आगाशे लिखित मंत्र आरोग्याचा पुस्तकाचे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : मनुष्यजन्म एकदाच मिळतो. परमेश्वराने अनमोल शरीर दिले आहे व योग, प्राणायाम करून आपण निरोगी, निरामय आयुष्य जगू शकतो. प्रत्येकाने दररोज किमान एक तास योग, प्राणायाम करावा, असे केल्यास माणूस कधीही निराश होणार नाही व पैशांची आसक्ती राहणार नाही. मनुष्यजन्म सार्थकी लागेल. स्वामी रामदेव महाराजांनी पतंजली योग समितीच्या माध्यमातून देशभरात योग पोहोचवला आहे. आपणही या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन पतंजली योग समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्या रमाताई जोग यांनी केले.
योगशिक्षक, योगसाधक अनंत आगाशे लिखित पुस्तक मंत्र आरोग्याचा या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या. साळवी स्टॉप- नाचणे येथील ओम साई सांस्कृतिक भवनात हा कार्यक्रम झाला.
या वेळी प्रास्ताविकामध्ये आगाशे यांनी सांगितले, २००८ पासून साळवी स्टॉप येथे योग शिकलो. अनेक शिबिरे सुरू केली. निःशुल्क योग शिकवत आहे. सुरुवातीला प्रतिसाद कमी होता; परंतु अव्याहतपणे जवळपास १७ वर्षे येथे योगकक्षा सुरू आहे. ओम साई सांस्कृतिक भवनही तेव्हा बांधले नव्हते. वैयक्तिक आयुष्यात योग, प्राणायामामुळे खूप फायदा झाला. हजारो लोक येथे योग शिकून गेले आहेत. सुरुवातीला पौर्णिमा दाते येथे योग, प्राणायाम शिकवत होत्या. जास्तीत जास्त लोकांना योगाची माहिती देण्याकरिता पुस्तक लिहिण्याचे ठरवले. या प्रसंगी मंचावर पतंजलीचे संघटनमंत्री विनय साने, सहयोगशिक्षिका पौर्णिमा दाते, लेखक अनंत आगाशे व सत्वश्री प्रकाशनचे प्रमोद कोनकर उपस्थित होते. सूत्रसंचालन समीर भाटवडेकर यांनी केले. सुनीता सावंत यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com