कुडाळात शुक्रवारी
आरोग्य चिकित्सा

कुडाळात शुक्रवारी आरोग्य चिकित्सा

Published on

कुडाळात शुक्रवारी
आरोग्य चिकित्सा
कुडाळ ः जन्मजात बालकापासून १८ वर्षे वयोगटातील हृदयरोगग्रस्त प्रवर्गातील मुलांसाठी ‘२ डी इको तपासणी’ शिबिर १ ऑगस्टला जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथे आयोजित केले आहे. या शिबिरामध्ये हृदयरोग निदान झालेल्या बालकांना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सामंजस्य करार झालेल्या मुंबईतील बालाजी हॉस्पिटल, रहेजा हॉस्पिटल, कोकिलाबेन हॉस्पिटल, फोर्टिस हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल तसेच अॅपल सरस्वती कोल्हापूर व ज्युपिटर हॉस्पिटल पुणे या शासनमान्य रुग्णालयांत संदर्भित करून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. हृदयरोगग्रस्त प्रवर्गातील जास्तीत जास्त बालकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक राजेश पारधी यांच्याशी संपर्क साधावा.
---
‘कणकवलीतील वीज
पुरवठा सुरळीत करा’
कणकवली ः तालुक्यात येत्या चार दिवसांत विजेची कामे करून वीजपुरवठा सुस्थितीत झाली नाही, तर सर्व तालुक्यातींल गणेशमूर्ती तसेच सर्व कारागिरांना घेऊन महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली जाईल. त्यापुढे होणार्‍या परिणामांना महावितरण जबाबदार राहील, असे माजी सभापती सुरेश सावंत यांनी म्हटले आहे. सध्या सर्वत्र वीज जाणे-येणे सातत्याने सुरू आहे. दिवसा दर एक-दोन तासांनी वीज जाते. रात्री दहा-अकरा वाजल्यानंतर ग्रामीण भागातील वीज नसतेच. पुढील महिन्यात गणपतीचे आगमन होणार असल्यामुळे गणेशमूर्ती बनविण्याचे काम जोरात सुरू झाले आहे. त्यामुळे वीज नसेल तर कारागिरांना मूर्तीची कामे करणे फार अवघड होते.
---
दहा फुटी अजगराला
तुळस येथे जीवदान
वेंगुर्ले ः तुळस येथील रहिवासी आणि प्रसिध्द समालोचक अजय नाईक यांच्या मांगरात आलेल्या सुमारे १० फुटी अजगराला सर्पमित्र महेश राऊळ यांनी अथक परिश्रमाने सुरक्षितरित्या पकडले. त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले. अजय नाईक यांना आपल्या मांगरात कोणीतरी जनावर असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याबाबत सर्पमित्र महेश राऊळ यांना कळविले. महेश राऊळ यांनी तेथे येऊन पाहिले असता तो भला मोठा अजगर असल्याचे निदर्शनास झाले. त्यांनी त्याला सुरक्षितरित्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. यासाठी वेताळ प्रतिष्ठानचे विवेक तिरोडकर यांचेही सहकार्य लाभले.
------
वाघ कुटुंबीयांना
राणेंकडून मदत
मालवण ः मेढा येथील मच्छीमार जितेश वाघ यांचे समुद्रात बुडून दुर्दैवी निधन झाले होते. आमदार नीलेश राणे यांनी त्यांच्या घरी जात आर्थिक मदत करून कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शहरप्रमुख दीपक पाटकर, महेश कांदळगावकर, सुदेश आचरेकर, बाळू तारी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com