जीजीपीएस प्रशालेत वृक्ष लागवड
-rat२९p३४.jpg-
२५N८०७९०
रत्नागिरी ः ‘जीजीपीएस’ प्रशालेतील विद्यार्थिनी स्वरा साळवी हिच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. सोबत मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर, महेश मुळ्ये, सुविधा तोडणकर, अश्विनी भाटकर, सविता पिल्लई, गायत्री साळवी यांच्यासह ‘सकाळ’चे उपसंपादक राजेश कळंबटे, वितरण प्रतिनिधी चिनार नार्वेकर, जाहिरात विभागाचे साहाय्यक व्यवस्थापक संजय पंडित आदी.
----
‘जीजीपीएस’मध्ये सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड
‘सकाळ’चा पुढाकार ; विनोद प्रभूदेसाईंचे सहकार्य
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ ः पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोचावा यासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्रजी माध्यम शाळेत (जीजीपीएस) जागतिक निसर्ग संवर्धनदिनी सोमवारी (ता. २८) वृक्षारोपण करण्यात आले.
प्रशालेच्या परिसरात कदंब, ताम्हिण, वड अशा सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. हा उपक्रम हरचेरी येथील महालक्ष्मी रोपवाटिकेचे विनोद प्रभुदेसाई आणि दैनिक सकाळच्या सहकार्याने राबवण्यात आला.
सोमवारी सकाळी जीजीपीएस प्रशालेच्या परिसरातील मैदानाच्या बाजूने रोपांची लागवड करण्यात आली. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हे घोषवाक्य सर्वज्ञात आहे. आपण सर्वजण निसर्गपूजक आहोत. त्यामुळे पर्यावरण रक्षण करण्याचे वेगवेगळे उपक्रम, कार्यक्रम हाती घेत असतो. त्या अनुषंगाने निसर्गाचे संवर्धन करत असतो. या निसर्गाचे आपण काही देणे लागतो. निसर्गातील वृक्ष हे आपल्याला खूप काही देत असतात. याच हेतूने प्रशालेमध्ये दरवर्षी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण केले जाते. त्यानुसार यंदा हा उपक्रम घेण्यात आला.
या वेळी माध्यमिक मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर, ज्येष्ठ शिक्षिका सुविधा तोडणकर आणि अश्विनी भाटकर, सविता पिल्लई, गायत्री साळवी, ज्येष्ठ शिक्षक महेश मुळ्ये, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यासह सकाळचे उपसंपादक राजेश कळंबटे, वितरण प्रतिनिधी चिनार नार्वेकर, जाहिरात विभागाचे साहाय्यक व्यवस्थापक संजय पंडित उपस्थित होते. या प्रसंगी पाटणकर यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले. त्या म्हणाल्या, प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावून ते जगवले पाहिजे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरण बदलाचा परिणाम वारंवार अनुभवायला मिळत आहे. त्यासाठी पर्यावरण संवर्धन काळाची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.