आजगाव वेतोबा मंदिरात हरिनाम सप्ताहास प्रारंभ

आजगाव वेतोबा मंदिरात हरिनाम सप्ताहास प्रारंभ
Published on

80977

आजगाव वेतोबा मंदिरात
हरिनाम सप्ताहास प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. ३०ः आजगाव येथील श्री देव वेतोबा मंदिरात सध्या हरिनाम सप्ताह सुरू असून, भक्तांच्या गर्दीने गावात भक्तीचा मळाच फुलल्याचे जाणवत आहे. आजगाव वेतोबा मंदिरात गेले पाच दिवस हरिनाम सप्ताह सुरू आहे. या कार्यक्रमाची सांगता शुक्रवारी (ता. १) आठव्या दिवशी काल्याने होणार आहे. हरिनाम सप्ताहानिमित्त मंदिर आकर्षक फुलांनी सजविले आहे. आकर्षक असा हालता देखावा साकारला आहे. घोड्यावर स्वार असलेल्या वेतोबाचे देखणे रुप पाहण्यासाठी भाविक भक्तांची सध्या मंदिरात गर्दी होत आहे. रोज पारकऱ्यांच हरिनाम सुरू आहे. हरिनाम सप्ताह सुरुवातीला मंदिरात गावकरी, मानकरी, पारकरी, देव सेवेकरी एकत्र येत श्री वेतोबा चरणी श्रीफळ ठेवून गाऱ्हाणे घातले गेले. आठव्या दिवशी भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. भाविकांनी हरिनाम सप्ताहात सहभागी होऊन श्री वेतोबाचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन केले आहे.
....................

तुळसुलीत विद्यार्थ्यांना
‘आयडीयल स्टडी ॲप’
कुडाळ, ता. ३० ः रोटरी क्लब ऑफ कुडाळकडून श्री लिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तुळसुली येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना आयडीयल स्टडी ॲपचे वितरण अध्यक्ष राजीव पवार व असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे सचिव मकरंद नाईक, सदस्या सई तेली, प्रभारी मुख्याध्यापक मनाली नाईक, पालक प्रतिनिधी प्रवीण वारंग आदी उपस्थित होते.
आयडीयल स्टडी ॲपचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन सचिन मदने यांनी विद्यार्थ्यांना केले. या ॲपमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती वाढणार असून, ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल, असे प्रतिपादन रोटरी क्लबचे अध्यक्ष राजीव पवार यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com