संगमेश्वर-बोरसुतकर गुरुजींचा शाडूमातीतील कलाविष्कार

संगमेश्वर-बोरसुतकर गुरुजींचा शाडूमातीतील कलाविष्कार

Published on

80991

बोरसुतकर गुरुजींचा शाडूमातीतील कलाविष्कार
कसब्यातील गणपती कलामंदिर; ७५ वर्षांची परंपरा, ३५०हून अधिक मूर्ती
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ३० ः कसबा येथील गणेश कलामंदिर ही एक अशी जागा आहे जिथे गेली ७५ वर्षे गणेशमूर्ती बनवण्याची परंपरा आजही कायम आहे. येथे दरवर्षी सुमारे ३५०हून अधिक शाडूमातीच्या आकर्षक मूर्ती तयार केल्या जातात. या परंपरेचे संवर्धन ज्येष्ठ मूर्तिकार मुरलीधर बोरसुतकर गुरुजी यांनी केले आहे.
गुरुजींच्या वडिलांनी (कै.) विठ्ठल लक्ष्मण बोरसुतकर यांनी १९५२ मध्ये या कलेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या निधनानंतर मुरलीधर बोरसुतकर यांनी १९७४ पासून शृंगारपूर येथे काही वर्षे मूर्ती बनवण्यास सुरुवात केली. त्या काळात मूर्तीची संख्या मर्यादित होती; मात्र १९७८ पासून त्यांनी कसबा येथेच आपल्या राहत्या घरी शाडूमातीच्या गणेशमूर्ती तयार करायला सुरुवात केली आणि तेव्हापासून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे.
गुरुजी दरवर्षी मे महिन्यापासून मूर्ती तयार करण्याच्या कामाला आरंभ करतात. त्यांच्या कारखान्यात एक फूटपासून ते चार फूट उंचीपर्यंतच्या विविध मूर्ती तयार केल्या जातात. यामध्ये घोड्यावर आरूढ गणपती, फुलांमधून अवतरलेला गणपती, उंदरावर विराजमान गणपती, दगडूशेठ हलवाई स्टाईल, लालबागच्या राजाची प्रतिकृती, अशा नानाविध आकर्षक मूर्तींचा समावेश आहे.
यावर्षी गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून सुरू होत असल्यामुळे मूर्तिकारांवर वेळेचा ताण अधिक आहे. कमी कालावधीत अधिक मूर्ती तयार करण्याचे आव्हान असले, तरीही गुणवत्ता आणि कलात्मकता यांच्यात तडजोड न करता गुरुजी आणि त्यांची टीम काम करत आहे. ७५ वर्षांची परंपरा, तितक्याच ताकदीने जपलेली निष्ठा आणि मातीतील सृजनशक्ती मुरलीधर बोरसुतकर गुरुजींच्या कार्यातून उलगडते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com