ःबस बंद पडल्याने खेड-दापोली मार्ग १ तास ठप्प

ःबस बंद पडल्याने खेड-दापोली मार्ग १ तास ठप्प

Published on

-rat३०p२६.jpg ः
P२५N८१०५६
खेड ः खेड-दापोली रस्त्यावर अचानक एसटी बस बंद पडल्याने झालेली वाहतूककोंडी.
----
खेड-दापोली मार्ग एक तास ठप्प
बस पडली बंद ; नागरिक त्रस्त, वाहतूक पोलिस गायब
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ३० : खेड-दापोली मार्गावरील वाहतूककोंडी आता नित्याची बाब झाली आहे; मात्र आज सकाळी दापोलीहून खेडकडे येणारी एसटी बस अचानक बंद पडल्याने तब्बल एक तास संपूर्ण रस्ता ठप्प झाला. वाहनांच्या रांगा कित्येक मीटर लांब लागल्या होत्या. त्यामुळे वाहनचालक, प्रवासी व नागरिक अक्षरशः हैराण झाले.
खेड नगरपालिकेच्या हद्दीत असलेले खड्डे, फुटलेल्या साईडपट्ट्या, उघडी गटारे आणि रस्त्यालगत वाढलेले अतिक्रमण यामुळे आधीच वाहनचालकांचा जीव मेटाकुटीला येतो. त्यातच या नादुरुस्त एसटी बसने आजचा दिवस आणखी संकटमय केला. विशेष म्हणजे या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी एकही पोलिस कर्मचारी हजर नव्हता. दोन वर्षांपूर्वी शहरात बसवलेले सीसीटीव्ही आणि ध्वनिक्षेपकदेखील आता नादुरुस्त असून, त्याकडे प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, खेड नगरपालिका, एसटी प्रशासन आणि वाहतूक विभाग या तीनही यंत्रणा नागरिकांच्या समस्या सोडवण्यास अपयशी ठरत असल्याची टीका होऊ लागली आहे.

चौकट
बैलगाडी चालवण्याचा अनुभव
खेड शहरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. या रस्त्यावरून वाहने चालवताना बैलगाडी चालवण्याचा अनुभव येतो. त्यामुळे पालिकेने लोकलज्जेखातर तरी रस्त्याची डागडुजी करावी आणि एसटी महामंडळाने सुस्थितीतील गाड्या प्रवाशांसाठी द्याव्यात. गळक्या एसटी बसमुळे प्रवासीदेखील हैराण झाले आहेत, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते अशोक आंब्रे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com