उड्डाणपुलाच्या बांधकामात मध्यभागी सखल भाग

उड्डाणपुलाच्या बांधकामात मध्यभागी सखल भाग

Published on

-rat३०p१८.jpg-
२५N८१०२२
सावर्डे : आरवली उड्डाणपुलावरील धोकादायक सखल भाग. (अशोक कदम ः सकाळ छायाचित्र सेवा )
------------
उड्डाणपुलावर मध्यभागी सखल भाग
अपघाताची शक्यता ; सूचना फलक लावण्याची गरज
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. ३०: संगमेश्वर तालुक्याच्या उत्तरेकडील आरवली येथील चारपदरी उड्डाणपुलाच्या बांधकामात मुख्य मार्गावर पुलाच्या मध्यभागी सुमारे दहा मीटर लांबीचा सखल भाग तयार करण्यात आला आहे. वेगात असलेल्या वाहनचालकांना अचानक सखल भागाचा अंदाज येत नाही. यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. वाहनधारकांकडून बांधकाम विभागाच्या या ढिसाळ कारभाराबाबत कमालीची नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या आरवली ते चिपळूणदरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरण काँक्रिटीकरणाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. महामार्ग चारपदरी असल्याने सर्वच वाहने सुसाट वेगाने धावत असतात. आरवली येथे उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही त्यामध्ये काही ठिकाणी नियोजनाच्या कमतरता स्पष्टपणे जाणवत आहेत. विशेषतः पुलाच्या मध्यभागी अंदाजे १० मीटर लांबीचा मूळ रस्त्याच्या उंचीपेक्षा सखल भाग तयार केला आहे. उड्डाणपुलावर सुसाट वाहने आले असता अचानक सखल भाग येतो. सखल भाग पाहता वाहनचालकांना सुस्पष्ट सूचना किंवा मार्गदर्शक फलक नसल्याने गाडीचा वेग योग्य पद्धतीने नियंत्रित करता येत नाही. अचानक ब्रेक लावल्याने वाहने जोरात आदळतात. रात्रीच्यावेळेस किंवा पावसाळ्यात हे अधिकच धोकादायक ठरू शकते. स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकवेळा तक्रार केली असली तरी अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. सखल भाग ओळखण्याकरिता झेब्रा मार्किंग, रेडिअम पट्ट्या, किंवा चेतावणी फलक लावणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत वाहनधारकांनी व्यक्त केले आहे. पोलिस प्रशासन व बांधकाम विभागाने या बाबींकडे तातडीने लक्ष देऊन वाहनचालकांच्या सुरक्षेची योग्य खबरदारी घ्यावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com