लांजा-विकास आराखडा रद्द होणार नाही
rat30p30.jpg-
81076
किरण सामंत
--------------
लांजा विकास आराखडा रद्द होणार नाही
आमदार किरण सामंतः आवश्यक तो बदल करण्याची ग्वाही, काहींचे विनाकारण राजकारण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० : लांजा विकास आराखडा प्रसिद्ध झाला तेव्हा समन्वयाची बैठक झाली. टाऊन प्लॅनर, मुख्याधिकारी, इंजिनिअर आदी उपस्थित होते. हा विकास आराखडा रद्द होणार नाही; परंतु यामध्ये जे काही बदल असतील ते नक्की करू. काल काही लोक मंत्री नितेश राणे यांना भेटले. ते देखील माझ्या मताप्रमाणे असतील. लोकांना आवश्यक तो बदल आराखड्यात करू, त्यामुळे तो रद्द करण्याची वेळ येणार नाही. आराखड्यात कोणाचेही नुकसान होणार नाही, कोणाची जागा फुकट घेतली जाणार नाही. ज्या सुधारणा असतील त्या करू. काही लोकांना राजकारण करायचे आहे, अशी स्पष्ट भूमिका आमदार किरण सामंत यांनी मांडली.
येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक चर्चेवेळी ते बोलत होते. लांजा शहरविकास आराखड्याला गेल्या काही दिवसांपासून विरोध होत आहे. काही लोकांचा या आराखड्याला पाठिंबाही आहे; परंतु यावरून राजकारण सुरू आहे. याबद्दल आमदार किरण सामंत यांना विचारले असता ते म्हणाले, शहराच्या विकासासाठी हा विकास आराखडा आहे. त्यामुळे तो रद्द होणार नाही. काहीजण यात राजकारण करत आहेत. काहींनी आंदोलनही केले, काही मंडळी भाजपाचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनाही भेटले. आपणही नितेश राणे यांच्याशी बोलणार आहोत. त्यांचीही भूमिका आराखडा नको अशी नसेल. या आरखड्यामुळे कुणाचे नुकसान होणार नाही. फुकट जागा कुणाची घेतली जाणार नाही. त्याचा योग्य मोबदला दिला जाईल. हा आराखडा मागील दोन वर्षापूर्वी प्रसिद्ध होणे आवश्यक होते; मात्र तो झाला नाही; मात्र हा आराखडा झाल्यास लांजाच्या भविष्यातील विकासाला महत्वाची दिशा देणारा असेल, असेही त्यांनी सांगितले.
पाणी, शाळा, आरोग्य, वीज आणि औद्योगीकरण हे आपले मतदार संघातील विकासाचे टार्गेट आहे. त्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांनी कबूल केले आहे की, लांजा-राजापूरसाठी काहीतरी स्पेशल देऊ त्या दृष्टीने लवकरच याबाबत निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची भूमिका किरण सामंत यांनी सांगितले.
चौकट
इलेक्ट्रिकल व्हेईकल कारखाना आणणार
लांजा - राजापूरमध्ये औद्योगिकरण होणे आवश्यक आहे. विकासाच्यादृष्टीने हे तालुके मागे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून या ठिकाणी इलेक्ट्रिकल व्हेईकल कारखाना आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचप्रमाणे येथील बंदराचा विकासही केला जात आहे. यापूर्वी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या लोकांशी आपण चर्चा केली असून, जवळपास साडेसहा हजार हेक्टर जागेवर हे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
चौकट
युवापिढीसाठी वाटद एमआयडीसी आवश्यक
युवापिढीच्या हाताला याच ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी वाटद भागात प्रदूषणविरहित प्रकल्प येणे आवश्यक आहेत. त्या ठिकाणी डिफेन्स, ड्रोन आणि सोलर बॅटरीचे प्रकल्प येणार असून, स्थानिकांनाच या ठिकाणी उद्योगात प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आमदार सामंत यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.