चिपळूण ःपूर्वकल्पना न देता वीज मीटर बसवले
81100
पूर्वकल्पना न देता वीज मीटर बसवले
ग्राहक संतप्त; पूर्वसूचना देण्याचे महावितरणचे आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३०ः सक्तीने स्मार्ट वीजमीटर बसवण्यावरून तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. येथील कसिम बाचने, हश्मत महालदार, मुजफ्फर दिवेकर यांचे लॉक फोडून कोणतीही पूर्वकल्पना न देता मीटर बसवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आज झालेल्या चर्चेदरम्यान उघडकीस आला. संबंधित विभागाने या प्रकाराबाबत जनतेची व लोकप्रतिनिधींची माफी मागितली. आगामी काळात कोणतेही नादुरुस्त मीटर बदलण्यापूर्वी पूर्वसूचना दिली जाईल, असे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले.
तालुक्यातील रामपूर विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटरला विरोध करण्यासाठी महावितरण कार्यालयावर धडक दिली. या वेळी तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, शहराध्यक्ष रतन पवार, विधानसभा क्षेत्राध्यक्ष योगेश शिर्के, प्रकाश साळवी, नीलेश चव्हाण, इम्दाद चौगले, हश्मत महालदार, कसिम बाचने, मकबूल बाचने, हश्मत चौगले, नूर मोहम्मद गोवळकर, निसार गोवळकर, नदिरा चौगले, नझीर चौगले, संजय शिर्के, श्रीपाद शिर्के, महाडिक, कबीर गोलंदाज, नंदू सावंत आदी उपस्थित होते.
जनतेच्या संमतीशिवाय स्मार्टमीटर बसवण्याची सक्ती सहन केली जाणार नाही. प्रशासनाने हा प्रकार थांबवावा अन्यथा उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. कोणत्याही नागरिकाच्या घरातील दुकानातील वीजमीटर जर नादुरुस्त नसल्यास पूर्वकल्पना न देता मीटर बदलून घेऊ नये. अशा प्रकाराला एकत्रित विरोध करून प्रशासनास स्पष्ट संदेश द्यावा. संमतीशिवाय कोणतेही मीटर बसवले किंवा बदलले जाणार नाही. हा अधिकार आपणच जपायचा आहे, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले.
चौकट
१२ ऑगस्टपासून उपोषण
स्मार्ट मीटरविरोधात चिपळूण तालुका संरपच संघटनेने यापूर्वीच महावितरण कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार १२ ऑगस्टपासून हे उपोषण सुरू केले जाणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष योगेश शिर्के यांनी दिली. या उपोषणात तालुक्यातील १३० ग्रामपंचायतींचे सरपंच सहभागी होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.