केरवडे तर्फ माणगाव शाळेत विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे

केरवडे तर्फ माणगाव शाळेत विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे

Published on

swt313.jpg
81196
केरवडे तर्फ माणगाव ः ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून संगणक प्रशिक्षणाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

केरवडे तर्फ माणगाव शाळेत
‘ग्लोबल’तर्फे संगणकाचे धडे
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३१ः पिंगुळी येथील ग्लोबल फाउंडेशन ही संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील शाळा आणि महाविद्यालये यामध्ये संगणक प्रशिक्षणाचे आयोजन करते.
याअंतर्गत केरवडे तर्फ माणगाव या प्रशालेमध्ये दहा दिवशीय संगणक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती मातेच्या फोटोला पुष्पहार घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ग्लोबलचे व्यवस्थापक प्रसाद परब, सरपंच श्रीया ठाकूर, शालेय व्यवस्थापनच्या उपाध्यक्षा श्रीमती मल्हार, स्थानिक ग्रामस्थ व सेवानिवृत्त शिक्षक व्ही. के. परब, प्रशिक्षक स्वप्नील नाईक, मुख्याध्यापक गवस, ग्लोबलचे सहाय्यक उमेश गावडे, प्रथमेश परब व अन्य मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. ग्लोबलचे व्यवस्थापक परब यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणाबद्दल माहिती दिली.
प्रशिक्षणाचा लाभ ३२ विद्यार्थ्यांनी घेतला. प्रशिक्षण कालावधीत संगणक सराव सत्र व हाताळणे आदींचे तपशीलवार ज्ञान स्वप्नील नाईक यांनी दिले. सूत्रसंचालन महेश गावडे यांनी केले. आभार श्री. सावंत यांनी मानले.
......................
swt314.jpg
81197
शिडवणे ः नागोबा निबंध व चित्रकला स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

‘नागोबा’ निबंध, चित्रकला
स्पर्धेला शिडवणेत प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ३१ : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे क्र. १ शाळेत नागपंचमी निमित्त ‘नागोबा निबंध’ व ‘चित्रकला’ स्पर्धांचे पारितोषिक वितरण उत्साहात पार पडले. नागाविषयी जनजागृती व्हावी, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवृत्त पोलिस अधिकारी विजय टक्के, सदाशिव कुडतरकर, मंगेश शेट्ये, विजय शेट्ये, दयानंद कुडतरकर, संतोष टक्के, दिनेश रांबाडे, संचिता टक्के, प्रणव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्याध्यापक प्रवीण कुबल व शिक्षकांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. विजय टक्के यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांच्या उपक्रमांचे कौतुक केले. स्पर्धेचा निकाल गुणानुक्रमे पुढीलप्रमाणे : नागोबा निबंध स्पर्धा-फरीन शेख (सातवी, सर्वोत्तम), शुभ्रा पांचाळ (पाचवी, उत्तम), श्रेयांश पांचाळ (पाचवी, उत्तेजनार्थ). नागोबा चित्रकला स्पर्धा-सानवी भोवड (पहिली, सर्वोत्तम), यश धाक्रस (दुसरी, उत्तम), रिया कुडतरकर (तिसरी, सर्वोत्तम), शर्वरी पाळेकर (तिसरी, उत्तम), सार्थ पाटणकर (सहावी, सर्वोत्तम), शफा शेख (सातवी, उत्तम). या यशस्वी मुलांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी आभार मानले.

Marathi News Esakal
www.esakal.com