शांती कदम यांचा बांद्यात ठाकरे शिवसेनेतर्फे सत्कार

शांती कदम यांचा बांद्यात ठाकरे शिवसेनेतर्फे सत्कार
Published on

81211

शांती कदम यांचा बांद्यात
ठाकरे शिवसेनेतर्फे सत्कार
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १ः येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या परिचारिका शांती कदम यांची प्रशासकीय बदली झाल्याने त्यांचा बांदा ठाकरे शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. परिचारिका कदम या ठिकाणी २४ तास रुग्णसेवा करत होत्या. त्यांच्या या कार्याची दखल घेत ठाकरे सेनेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शहर प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, भाऊ वाळके, ओंकार नाडकर्णी, राजन येडवे, विशू पावसकर, सुंदर गवंडी, राजदीप पावसकर, निखिल मयेकर, नागेश बांदेकर, जितू भिसे, ज्ञानेश्वर येडवे, गिरीश भोगले, अभिजित देसाई, बंड्या बहिरे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग आदी उपस्थित होते.
.......................
swt3112.jpg
81212
बांदाः बसस्थानक येथे कचराकुंड्या प्रदान करताना रोटरी क्लबचे पदाधिकारी.

रोटरी क्लब ऑफ बांदातर्फे
बस स्थानकास कचराकुंड्या
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १ः बांदा परिसरातील स्वच्छतेला चालना देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बांदाच्या वतीने येथील बस स्थानक येथे दोन नवीन कचराकुंड्या प्रदान करण्यात आल्या. बुधवारी (ता. ३०) हा उपक्रम पार पडला. यावेळी रोटरी क्लब ऑफ बांदाचे अध्यक्ष शिवानंद भिडे, खजिनदार सुदन केसरकर, क्लबचे सदस्य फिरोज खान, योगेश परळकर, विराज परब आदींसह बांदा एसटी आगार व्यवस्थापक तसेच सावंतवाडी आगार व्यवस्थापक उपस्थित होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून बसस्थानकावर स्वच्छता राखली जावी तसेच प्रवाशांनी कचरा इतरत्र न टाकता कचराकुंड्यांचा उपयोग करावा, असे आवाहन यावेळी रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी केले. या उपक्रमामुळे स्थानिक प्रवासी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. रोटरी क्लबने यापुढेही सामाजिक उपक्रम राबविण्याचे आश्वासन यावेळी दिले.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com