दहावीच्या विद्यार्थ्यांना ''आयडियल स्टडी ॲप''
81223
दहावीच्या विद्यार्थ्यांना
‘आयडियल स्टडी ॲप’
खारेपाटणमध्ये उपक्रमः रोटरी क्लबच्या पुढाकारातून वितरण
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ३१ : नव्याने स्थापन झालेल्या रोटरी क्लब ऑफ खारेपाटण व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी यांच्यावतीने येथील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय प्रशालेच्या दहावीतील एकूण १०६ विद्यार्थ्यांना व ६ वर्गशिक्षकांना उपयुक्त असे एकूण ११२ आयडिल स्टडी ॲपचे वितरण रोटरी क्लबचे अध्यक्ष दयानंद कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. या अॅपसाठी सुमारे २ लाख ६८ हजार रुपये एवढा खर्च करण्यात आला.
विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण अधिक प्रभावी पद्धतीने शिकता यावे व त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत मिळावे, या उद्देशाने रोटरी क्लब खारेपाटण यांनी हा उप्रकम राबविला. स्टडी ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोणताही विषय सहजपणे समजणार असल्याचे खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सानप यांनी सांगितले. यावेळी पर्यवेक्षक संतोष राऊत, रोटरी क्लब खारेपाटणचे सचिव अजय गुरसाळे, तसेच सारिका महिंद्रे, सुबोध देसाई, प्रियेशा अमृते, शर्मिन काझी, लक्ष्मीकांत हरयान, खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य मनाली होनाळे, पालक संघाचे सदस्य ऋषिकेश जाधव आदी मान्यवर तसेच शिक्षक, पालक संघाचे पदाधिकारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशा प्रकारचे आयडिल स्टडी ॲप खारेपाटण रोटरी क्लबच्या वतीने अजून १७५ शालेय विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार असल्याचे रोटरीचे अध्यक्ष कोकाटे यांनी सांगितले. या उपक्रमाबाबत खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, सचिव महेश कोळसुलकर यांनी रोटरी क्लबचे आभार व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.