महिलांचा कार्यशाळेस प्रतिसाद
महिलांचा आदरातिथ्य
कार्यशाळेला प्रतिसाद
रत्नागिरी ः महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे महिलांसाठी मोफत आदरातिथ्य कार्यशाळा झाली. त्यात हॉटेल, रेस्टॉरंट, होम स्टे यांच्या सध्या कार्यरत कुशल व अकुशल महिला कर्मचारी सहभागी झाल्या. या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून हॉटेल उद्योजक मिथिल पित्रे व हॉटेल विवाच्या ममता नलावडे उपस्थित होते. ग्राहकसेवा या विषयावर पित्रे यांनी सेवा उत्तम देण्यासाठी लागणारी आव्यश्यक कौशल्ये, ग्राहक संवाद, हॉटेल उद्योगामधील विविध अनुभव पीपीटीच्या माध्यमातून मांडले. हाउस किपिंगमधील विविध जॉब रोल्स, जबाबदाऱ्या, करियर संधीबाबत नलावडे यांनी मार्गदर्शन केले. फ्रंटऑफिससाठी आवश्यक कौशल्य, ग्रुमिंग, विविध करियर संधी प्रा. सोनिया मापुसकर यांनी पीपीटीच्या माध्यमातून सादर केले. रत्नागिरी, गणपतीपुळे, मालगुंड, देवरूख, गुहागर येथील विविध लोक उपस्थित होते. सर्व सहभागींना कर्वे स्त्री शिक्षणसंस्थेचे प्रकल्प प्रमुख मंदार सावंतदेसाई यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सूत्रसंचालन सिद्धी सावंत यांनी केले. प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत यांनी आभार मानले.
नांदगाव शाळेमध्ये
शैक्षणिक साहित्य वाटप
चिपळूण ः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नांदगाव शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पक्षाचे तालुकाप्रमुख बळीराम गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली कोकरे जिल्हा परिषद गटाचे विभागप्रमुख अजित गुजर, उपविभागप्रमुख अनंत खैर, नांदगावचे शाखाप्रमुख संजय पवार, राजा भुवड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी नांदगाव शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रेश्मा खांडेकर, उपाध्यक्ष विजय कांबळे, सदस्य सुषमा जाधव, विजय जाधव, ज्ञानेश्वर कदम, आकांक्षा कदम, सुरेखा भुवड, महादेवबुवा खेतले, शाळेचे मुख्याध्यापक संजय कांबळे व शिक्षक उपस्थित होते.
सावर्डे ‘लायन्स’च्या
अध्यक्षपदी राजेशिर्के
संगमेश्वर ः लायन्स क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा सावर्डे येथील केदारनाथ बहुउद्देशीय सभागृहात झाला. या वेळी शपथविधी व पदग्रहण अधिकारी म्हणून एमजेएफ पीडीजी उद्धव लोध, डॉ. कृष्णकांत पाटील उपस्थित होते. नव्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी प्रा. प्रकाश राजेशिर्के, सचिवपदी राजेश कोकाटे व खजिनदारपदी डॉ. अरुण पाटील यांनी शपथ घेतली. या सोहळ्याचे आयोजन अत्यंत नेटके व उत्साही वातावरणात करण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.