जिल्हास्तर भजन स्पर्धेचे तळवडेत उद्या आयोजन

जिल्हास्तर भजन स्पर्धेचे तळवडेत उद्या आयोजन
Published on

जिल्हास्तर भजन स्पर्धेचे
तळवडेत उद्या आयोजन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३१ ः (कै.) प्रकाश परब यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आमदार दीपक केसरकर पुरस्कृत, शिवसेना तळवडे व प्रकाश परब फाउंडेशन आयोजित निमंत्रित जिल्हास्तरीय चक्रीय नॉनस्टॉप भजन स्पर्धा शनिवारी (ता. २) सायंकाळी ६ वाजता तळवडे येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात होणार आहे. यामध्ये महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी (बुवा-प्रसाद आमडोसकर), चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ वेंगुर्ले सुरंगपाणी (अनिकेत भगत), सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ कुडाळ (वैभव सावंत), कलेश्वर पूर्वादेवी प्रासादिक भजन मंडळ वेत्ये (प्रथमेश निगुडकर), सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ कणकवली (दुर्गेश मिठबावकर), लिंगेश्वर पावणाईदेवी प्रासादिक भजन मंडळ जानवली-कणकवली (योगेश मेस्त्री) हे संघ सहभागी होणार आहेत. प्रथम पारितोषिक ७००० रुपये व चषक, द्वितीय ६००० रुपये व चषक, तृतीय ४००० रुपये व चषक, चतुर्थ ३००० रुपये व चषक, उत्तेजनार्थ प्रथम २००० रुपये व चषक, उत्तेजनार्थ द्वितीय २००० रुपये व चषक तसेच उत्कृष्ट हार्मोनियम, तबला, गायक, झांजवादक, उत्कृष्ट पखवाज वादक यांना प्रत्येकी ५०० रुपये पारितोषिके ठेवण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी महेश परब व बाळू कांडरकर यांच्याशी संपर्क साधावा. लाभ घेण्याचे आवाहन समस्त गावकर मंडळी देवस्थान समिती, तळवडे ग्रामस्थ यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com