आपत्ती व्यवस्थापन ज्ञान आवश्यक

आपत्ती व्यवस्थापन ज्ञान आवश्यक

Published on

81272

आपत्ती व्यवस्थापन ज्ञान आवश्यक
निरीक्षक प्रभीशाः कट्टा महाविद्यालयात सुरक्षा कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३१ : ''आपदा सेवा सदैव सर्वत्र'' म्हणजेच ''आपत्तीच्या वेळी सदैव सेवा'' हे ब्रीदवाक्य असलेले राष्ट्रीय आपत्ती निवारण दल नेहमीच देशात कोणतीही आपत्ती आल्यास आपत्तीग्रस्तांचा बचाव व त्यांना मदत करण्यासाठी तत्पर असते. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. हे टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी काय करावे, आपत्तीग्रस्त लोकांची मदत कशी करावी, याचे ज्ञान प्रत्येक नागरिकाला असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन एनडीआरएफच्या निरीक्षक प्रभीशा यांनी येथे केले.
कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा संचलित डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने व वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा आणि वराडकर हायस्कूल कट्टा यांच्या सहकार्याने सिद्धिविनायक हॉल येथे शालेय व महाविद्यालय सुरक्षा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, उपप्राचार्य रविंद्र गावडे व वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्ट्याचे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक, एन. डी. आर. एफ. टीमचे सहाय्यक उपनिरीक्षक विजय मस्के, हवालदार मुकुंद शेळके, अनिरुद्ध गवांडे, प्रदीप पाटील, श्याम फापले, त्रिपुरारी कुमार, सय्यद अझहर, छत्रपती खांदवे, श्रीकांत पाटील, चेमटे वाल्मिक, नितीन वाघमोडे, गडाख विकास, संदीप खुटवड आदी उपस्थित होते.
प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यानंतर एन.डी.आर.एफ. टीममधील सदस्यांनी विविध प्रात्यक्षिके दाखवून दुर्घटना स्थळी वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वी प्रथमोपचार पद्धती, एखाद्याची श्वसन प्रक्रिया काही कारणांमुळे बंद पडली असता त्याला कृत्रिम श्वास कसा दिला जातो, त्याच्या पद्धती कोणत्या आहेत, अपघातग्रस्ताला उपचार देण्यासाठी स्टेचर उपलब्ध नसताना उपलब्ध साहित्याचा वापर करून स्ट्रेचर कसे बनवावे, आग लागली असता अग्निशमक यंत्राचा वापर कसा करावा तसेच भूकंप व पूर आल्यास काय करावे, आदींची माहिती दिली. यावेळी सहाय्यक उपनिरीक्षक मस्के यांनी देखील आपत्ती व्यवस्थापन विषयी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com