-कृषी प्रक्रिया संचालकांकडून पाहणी

-कृषी प्रक्रिया संचालकांकडून पाहणी

Published on

- rat३१p२४.jpg
२५N८११९२
ःपावस ः येथील फळप्रक्रिया प्रकल्पाची पाहणी करताना विनयकुमार आपटे. सोबत शिवकुमार सदाफुले, विनोद हेगडे आदी.

पावसमधील फळप्रक्रिया प्रकल्पांची
कृषी प्रक्रिया संचालकांकडून पाहणी
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १ ः कृषी प्रक्रिया व नियोजनचे संचालक विनयकुमार आवटे यांनी पावस, नाखरे आणि मावळंगे येथील विविध फळप्रक्रिया प्रकल्पांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच त्यांना मार्गदर्शनही केले.
मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजनेतील अर्थसाह्य घेतलेला पावस येथील रामचंद्र देसाई यांचा फळप्रक्रिया (आंबा पल्प) प्रकल्प, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेतून अर्थसाह्य घेतलेला नाखरे येथील महादेव नरवणे यांचा आंबाप्रक्रिया प्रकल्प, मावळंगे येथील संतोष शिंदे यांच्या फळप्रक्रिया प्रकल्पांची पाहणी केली. आवटे यांनी प्रक्रिया उद्योगांच्या सद्यःस्थितीतील अडचणी समजावून घेऊन पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.
---
---

Marathi News Esakal
www.esakal.com