साम्राज्य ग्रुपतर्फे खेर्डीत आरोग्य शिबिर

साम्राज्य ग्रुपतर्फे खेर्डीत आरोग्य शिबिर

Published on

साम्राज्य ग्रुपतर्फे खेर्डीत आरोग्य शिबिर
चिपळूण ः येथील साम्राज्य ग्रुप फाउंडेशन सामाजिक संघटनेच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात डॉ. अक्षय यादव आणि डॉ. पूजा भुरण यांनी रुग्णांची तपासणी करून उपचार केले. साम्राज्य ग्रुपच्या या शिबिराचा खेर्डी, चिपळूण परिसरातील गरजू रुग्णांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. या वेळी साम्राज्य ग्रुप फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष विनायक शिरगावकर, जिल्हा उपाध्यक्ष अक्षय पवार, जिल्हा संपर्कप्रमुख सिद्धार्थ पोळ, चिपळूण तालुकाध्यक्ष अथर्व घाग, उपाध्यक्ष तेजस मोरे, सचिव समीर शिंदे, सहसचिव नारायण येलकर, प्रसिद्धीप्रमुख आर्यन मोहिते, पियुष कदम, कोकण अध्यक्ष अक्की जाधव यांच्यासह सदस्य उपस्थित होते.


तायक्वॉंदो स्पर्धेत ‘युनायटेड’ची बाजी
चिपळूण : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित चिपळूण तालुकास्तरीय तायक्वॉंदो स्पर्धेत युनायटेड इंग्लिश स्कूलच्या आठ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १४ वर्ष वयोगटात श्रेया सावंत हिने प्रथम क्रमांक मिळवत बाजी मारली. स्वरा नटे, स्मित महाकाळ आणि आराध्य तटकरे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला तर १७ वर्ष वयोगटात शर्विल चव्हाण, विनय भावसार, मैत्रेयी पुरोहित, प्रणाली पवार व मुग्धा यादव यांनी प्रथम क्रमांक मिळवला. शिवम चव्हाणने द्वितीय तर संघर्ष कदम व शुभ्रद काणेकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

वेसवी ग्रामपंचायत व भाटे विद्यामंदिरतर्फे वृक्षारोपण
मंडणगड ः ग्रुपग्रामपंचायत वेसवी आणि के. व्ही. भाटे विद्यामंदिर वेसवी हायस्कूल हरितसेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत हद्दीतील केंगवल, नांदगाव या गावांच्या रस्त्याजवळ वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच प्रवीणा खाडे, उपसरपंच आनंद भाटे, ग्रामपंचायत सदस्या पूजा खाडे, ग्रामसेवक संतोष आंग्रे, प्रशालेतील शिक्षक, अंगणवाडी सेविका विद्यार्थी उपस्थित होते.


मुंडे महाविद्यालयात वृक्षारोपण
मंडणगड ः लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग व निसर्ग मंडळ विभागाच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठाच्या १६९व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मीक परहर होते. या वेळी संस्थेचे संचालक आदेश मर्चंडे, वैभव कोकाटे, उपप्राचार्य डॉ. विष्णू जायभाये, महाविद्यालयाचे एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप निर्वाण, डॉ. संगीता घाडगे, डॉ. महेश कुलकर्णी, निसर्ग मंडळ समन्वयक डॉ. शैलेश भैसारे आदी मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालय परिसरात बकुळ, जांभूळ, कोकम, चिंच, गुलमोहोर आदी विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. यामध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. संदीप निर्वाण, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. संगीता घाडगे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. संगीता घाडगे यांनी तर शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. शैलेश भैसारे यांनी मानले.

फिरती एक्स-रे व्हॅनद्वारे
आरोग्य तपासणीत कृषिदूतांना सहभाग
सावर्डे ः चिपळूण तालुक्यातील रामपूर प्राथमिक आरोग्यकेंद्रात फिरती एक्स-रे व्हॅन दाखल झाली आहे. त्यांना निकम कृषी महाविद्यालयाच्या मांडकी-पालवण येथील कृषिसखा गटाने रुग्णांची नोंदणी, रांगांचे नियोजन, एक्स-रे प्रक्रियेला मदत, माहितीपत्रकांचे वितरण यामध्ये डॉक्टरांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मोलाचे सहकार्य केले. या उपक्रमात रुग्णांचा मोफत छातीचा एक्स-रे काढण्यात आला. ही सेवा खोकला, ताप, दम लागणे, दीर्घकाळ औषधोपचार सुरू असलेले बीपी, डायबेटीसचे रुग्ण तसेच ६० वर्षांवरील नागरिक यांच्यासाठी विशेषत्वाने राबवण्यात आली. गावातील सुमारे २००हून अधिक ग्रामस्थांनी याचा लाभ घेतला. आरोग्यकेंद्रातील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची प्राथमिक चौकशी, तपासणीपूर्व माहिती संकलन व योग्य सल्ला देण्याचे काम करण्यात आले. प्राथमिक आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. धनराज मुंढे, डॉ. निकिता शिर्के, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. श्रीकांत तुपे, डॉ. नीलेश हळदे यांनी रुग्णांची तपासणी केली. अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला, आजारी रुग्ण यांना गावातच तपासणीची सुविधा मिळाल्याने त्यांची मोठी गैरसोय टळली. फिरती एक्स-रे सेवा ही गावपातळीवरील आरोग्यसुविधांमध्ये एक महत्त्वाचे पाऊल आहे. ग्रामीण भागात टीबी, न्यूमोनिया किंवा फुप्फुस विकार लवकर ओळखण्यासाठी छातीचा एक्स-रे उपयोगी ठरतो, असे डॉ. धनराज मुंढे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com